शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचे बसने पंढरपूरकडे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:04 IST

पैठण : आषाढी वारीसाठी संत श्री एकनाथ महाराज यांच्या पादुका पालखीचे परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने सोमवारी नाथमंदिरातून मोजक्या वारकऱ्यांसह ...

पैठण : आषाढी वारीसाठी संत श्री एकनाथ महाराज यांच्या पादुका पालखीचे परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने सोमवारी नाथमंदिरातून मोजक्या वारकऱ्यांसह पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

कोरोना सावटामुळे सलग दुसऱ्या वर्षी शासनाने पायीवारी रद्द केल्याने औपचारिक प्रस्थान झाल्यानंतर गेल्या १८ दिवसांपासून नाथांच्या पादुका गावातील नाथमंदिरात मुक्कामी होत्या. दरम्यान, विठ्ठल दर्शनाची आस असणाऱ्या वारकऱ्यांना यंदा विठुमाऊलीचे दर्शन घडणार नसल्याने पादुका प्रस्थानसमयी वारकऱ्यांत नाराजी असल्याचे दिसून आले. ४२३ वर्षांची पायीवारी प्रथा असलेल्या नाथांचा पायी पालखी सोहळा रद्द झाल्याने आषाढी एकादशीच्या दर्शनासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार दोन शिवशाही बसने सोमवारी ४० मानकऱ्यांसह पादुका पालखीस नाथमंदिरातून वाजत गाजत ‘भानुदास एकनाथ’ अशा गजरात निरोप देण्यात आला.

रोहयो मंत्री संदिपान भुमरे, पालखी प्रमुख हभप रघुनाथ महाराज पालखीवाले यांच्या हस्ते नाथमंदिरात पादुकांची आरती करण्यात आली. याप्रसंगी भाविकांनी ‘भानुदास एकनाथ’ नामाचा गजर करून पालखी असलेल्या बसवर पुष्पवृष्टी केली. यावेळी संत एकनाथ महाराज मंडळाचे विश्वस्त दादा बारे, रेखा कुलकर्णी, अरुण काळे, खुशाल भवरे, श्रीकृष्ण कुलकर्णी, दूध संघाचे चेअरमन नंदलाल काळे, शहर प्रमुख तुषार पाटील, नगरसेवक भूषण कावसानकर, ईश्वर दगडे आदींची उपस्थिती होती.

नाथ महाराजांच्या पादुका असलेल्या शिवशाही बसला पारंपरिक पालखीप्रमाणे सजविण्यात आले होते. बस निघाल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून भाविक, वारकरी मनोभावे अंत:करणातून हात जोडून बसचे दर्शन घेताना दिसून आले. तालुक्याच्या सीमेवर मंत्री भुमरे व तहसीलदार शेळके यांनी बसला निरोप दिला. बससोबत उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, नायब तहसीलदार संतोष अनर्थे, डॉ. सीमा साळवे व त्यांचे पथक पालखीसमवेत रवाना झाले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची व्हॅन पालखीसोबत पैठण ते पंढरपूर व पंढरपूर ते पैठण अशी राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी सांगितले.

--

विठ्ठलाच्या दर्शनास भाविक मुकणार

‘आषाढी कार्तिकी, विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग।’ ‘विसरू नका मज’ असे पांडुरंगाचे म्हणणे आहे. दुसरीकडे शासनाने प्रतिबंध लादून पायी वारी बंद केली आहे. आता आम्ही पायी वारी कशी करायची, अशा उद्विग्न प्रतिक्रिया वारीस जाणाऱ्या वारकऱ्यांतून सोमवारी उमटल्या. यंदा सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायीवारी रद्द झाल्याने हजारो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनास मुकणार असल्याने वारकरी अस्वस्थ झाले आहेत.

190721\img_20210719_161522.jpg

पैठण ते पंढरपूरकडे निघालेल्या संत एकनाथ हाराज यांच्या बसपालखीला निरोप देतान मान्यवर.