शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूसदृश्य आजाराने एकाचा मृत्यू

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

वडवळ : चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यूचा ज्वर सुरू झाला आहे़ यात एकाचा लातूरच्या खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली़

वडवळ : चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथे गेल्या आठ दिवसांपासून डेंग्यूचा ज्वर सुरू झाला आहे़ यात एकाचा लातूरच्या खाजगी रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली़ वडवळ नागनाथ येथील प्रतिक प्रकाश बावगे (१७) हा डेंग्यूच्या आजाराने फणफणत होता़ शनिवारी त्याला उपचारासाठी एका खाजगी रूग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला़ तसेच अक्षय सुदर्शन कुलकणी (७) याच्यावरही खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ तसेच अपेक्षा राजकुमार उस्तुमे, (९) हिच्यासह अन्य एकावर उपचार सुरू आहेत़ गेल्या आठ दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे़ परंतु याकडे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष दिसून येत आहे़वडवळ येथे शासकीय आयुर्वेदिक दवाखाना आहे़ मात्र गेल्या दीड वर्षापासून डॉक्टर नसल्याने गैरसोय आहे़ आरोग्य सेवकालाही झरी व वडवड उपकेंद्राचा पदभार दिल्याने गावातील नागरिकांचे मात्र हाल होत आहेत़ परिणामी रूग्णांना लातूर व चाकूर येथील रूग्णालयात धाव घ्यावी लागत आहे़ याबाबत ग्रामसेवक पी़व्ही़रेड्डी व सरपंच भगवान लोखंडे म्हणाले, स्वच्छते विषयीजनजागृजी करून कोरडा दिवस पाळण्याचे सक्ती करण्यात येईल़ जानवळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ़वाय़एस़दहीफळे म्हणाले, आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामाला लाउन अ‍ॅबेटींगची फवारणी करण्यात येईल़ शिवाय नागरिकांनीही स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी़ आपल्या परिसरात साचलेले पाण्याचे डबके, डासांचे उत्पादन कमी करण्यासाठी एक दिवस कोरडा दिवस पाळावा़