डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले
By Admin | Updated: September 13, 2014 00:34 IST2014-09-13T00:30:22+5:302014-09-13T00:34:24+5:30
शेख महेमूद तमीज, वाळूज महानगर बजाजनगरातील स्वच्छतेकडे एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, तिघांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले
हातकणंगले : हातकणंगले-पेठवडगाव मार्गावर नरंदे खिंड येथे रस्त्यावर दगड टाकून तलवार, चाकूचा धाक दाखवून वाहनधारकांना लुटण्याच्या हेतूने दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना हातकणंगले पोलिसांनी आज, शुक्रवारी पहाटे रंगेहाथ पकडले. धनाजी शामराव गोसावी (वय २६) व सागर संभाजी गोसावी (२६, दोघे रा. बागणी, ता. वाळवा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना आज वडगाव न्यायालयात हजर केले असता १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हातकणंगले पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, आज पहाटे चारच्या सुमारास नरंदे खिंड परिसरात रस्त्यावर आडवे दगड टाकून आठ-दहा तरुण दबा धरून बसले होते. येणाऱ्या वाहनधारकांना लुटून पळून जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. हातकणंगले पोलिसांची गस्त पथकाची गाडी या लुटारूंनी अडविली आणि ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले. पोलीस गाडी पाहताच त्यांनी स्वत:च्या मोटारसायकलवरून पळ काढला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून यातील धनाजी गोसावी आणि सागर गोसावी यांना ताब्यात घेतले. इतर सहा-सातजण पसार झाले. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
या लुटारू टोळीकडून या मार्गावरील वाहनधारक लूट प्रकरणाचा व चेन स्नॅचिंग प्रकरणाचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या संशयित आरोपींना आज वडगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. (प्रतिनिधी)