शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूसदृश तापाने

By admin | Updated: September 4, 2014 01:23 IST

जालना : भोकरदन तालुक्यात डेंग्यूसदृश तापाच्या साथीने चार गावांना घेरले असून दिवसेंदिवस गावांची संख्या तर वाढतेच आहे, मात्र तापामुळे बळींची संख्याही ३ वर पोहोचली आहे

जालना : भोकरदन तालुक्यात डेंग्यूसदृश तापाच्या साथीने चार गावांना घेरले असून दिवसेंदिवस गावांची संख्या तर वाढतेच आहे, मात्र तापामुळे बळींची संख्याही ३ वर पोहोचली आहे. साथरोगाच्या परिस्थितीत आरोग्य विभागाने फारशी दक्षता न बाळगल्याने ऐन सणासुदीच्या काळात ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पद्मावती, जळगाव सपकाळ, कोदोली आणि लेहा या चार गावांमध्ये या तापाची साथ सुरू असून रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांना उपचारासाठी त्यांचे नातेवाईक बुलढाणा किंवा औरंगाबाद येथे नेत आहेत. अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या गंभीर प्रकाराची पाहिजे तशी दखल न घेतल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. पद्मावती येथे बालवयीन भाऊ-बहिणीचा तर जळगाव सपकाळ येथे एका तरूणाचा तापाने मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाने या गावांना भेटी दिल्या. मात्र तातडीने उपाययोजना झालेली नाही, असा ग्रामस्थांचा सूर आहे. मात्र आवश्यक उपाययोजना करण्यात येत असल्याचा दावा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. साथरोग असलेल्या गावांमध्ये आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण केले असून घरोघर पाण्यातील डासअळींचा शोध घेतला आहे. तर काही गावांमध्ये रुग्णांची संख्या एक-दोन अशीच असल्याचा दावाही या पथकातील सदस्यांनी केला आहे. लेहा येथे साथरोगाने थैमान घातलेले असताना या गावासाठी असलेल्या धावडा आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व आरोग्यसेवक सतत गैरहजर राहतात, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. (प्रतिनिधी) जळगाव सपकाळ : ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी साथरोगांच्या काळातही बेजबाबदारपणे वागत असल्याचा नमूना जळगाव सपकाळ येथे बुधवारी पाहावयास मिळाला. साथरोगाच्या पार्श्वभूमीवर भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे यांनी आरोग्य केंद्रास भेट दिली असता, वैद्यकीय अधिकारी एस.आर. देवकाटे हे गैरहजर आढळून आले. विशेष म्हणजे त्यांचा भ्रमणध्वनीही बंद होता. तेथे उपस्थित दोन आरोग्यसेविका, औषधनिर्माता किंवा शिपाई यांना वैद्यकीय अधिकारी कुठे ? हे सांगता आले नाही.