शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

जिल्हा परिषद येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळांमध्ये राबविणार ‘डेन्स फॉरेस्ट’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 6:39 PM

पर्यावरण संवर्धनासाठी शिक्षण विभागाचा पुढाकार 

औरंगाबाद : शाळेतील प्रत्येक मुलावर निसर्ग संवर्धनाचे संस्कार व्हावेत, यासाठी नवीन शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये डेन्स फॉरेस्ट उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

प्रामुख्याने शाळांमध्ये असलेल्या वृक्षांना पाणी देणे, त्यासाठी ‘एक वृक्ष, एक विद्यार्थी’, ‘एक वृक्ष, एक शिक्षक’ हा उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. डेन्स फॉरेस्ट उपक्रमाच्या माध्यमातून शहर, औद्योगिक परिसरातील शाळांमधील झाडांची जोपासना केल्यास ही झाडे वाढतील, मोठी होतील, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे जूनपासून हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. 

माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी डेन्स फॉरेस्ट प्रकल्प राबविण्यात आला. सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान सिडको एन-२, एन-६, एन-७ व एन-८ आदी परिसरातील शाळांचे शिक्षक व विद्यार्थ्यांनी शाळा, मुख्य रस्ता, परिसरातील झाडांना पाणी दिले. तत्पूर्वी, अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, दोन्ही शिक्षणाधिकारी, वन विभाग तसेच वुई फॉर एन्व्हायर्नमेंटचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिजामाता हायस्कूलच्या प्रांगणात ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर शाळा व परिसरातील झाडांना पाणी दिले. यासाठी एन-५, ६, ७ या परिसरात पाचशे विद्यार्थी, तीनशे शिक्षक बजरंग चौकात एकत्र आले होते. 

विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरांत वृक्षसंवर्धनाचा संदेश पोहोचवणे, हा यामागचा उद्देश होता. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर, शिक्षण विस्तार अधिकारी रमेश ठाकूर, लईक सोफी, अनिल पवार आदींनी परिश्रम घेतले. या उपक्रमात जिजामाता विद्यालय, धर्मवीर संभाजी विद्यालय, बळीराम पाटील विद्यालय, वेणूताई विद्यालय, सोनामाता विद्यालय, मुकुल मंदिर विद्यालय, क्लेव्हर डेल आदी शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. 

झाडांना पाणीविद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी चिश्तिया कॉलनी पोलीस चौकी ते बळीराम पाटील हायस्कूलपर्यंत रस्त्याच्या दुभाजकामधील झाडांना पाणी दिले. 

टॅग्स :Natureनिसर्गAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदEducationशिक्षणSchoolशाळा