शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

‘हेडगेवार’च्या कर्मचाऱ्यांची दुसऱ्या दिवशीही निदर्शने

By admin | Updated: July 1, 2014 01:09 IST

औरंगाबाद : डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी भारतीय मजदूर संघाच्या बॅनरखाली वेतनवाढीसाठी सुरू केलेले आंदोलन चिघळले आहे.

औरंगाबाद : डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी भारतीय मजदूर संघाच्या बॅनरखाली वेतनवाढीसाठी सुरू केलेले आंदोलन चिघळले आहे. दोन दिवसांपासून हे कर्मचारी ड्यूटी संपताच प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी व निदर्शने करत आहेत. सोमवारी दुपारी झालेल्या निदर्शनांमुळे रुग्णालयाचे प्रवेशद्वार दणाणून गेले.डॉ. हेडगेवार रु ग्णालयात भारतीय मजदूर संघटना आणि इंटर्नल कर्मचारी संघटना सक्रिय आहेत. या दोन्ही संघटनांनी वेतनकरार करावा, यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. संघटनेने सर्व कर्मचाऱ्यांना दरमहा १३ हजार रुपये वेतनवाढ द्यावी, अतिरिक्त कामाचा मोबदला दुप्पट दराने द्यावा, रजेचे रोखीकरण करावे आदी मागण्या केल्या आहेत. प्रशासनाने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत आतापर्यंत २७ बैठका घेऊन ३ हजार ७०० रुपये वेतनवाढ देण्याची तयारी दाखविली. मात्र, संघटना आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने आंदोलन चिघळल्याचे दिसते. याविषयी संघटनेचे प्रतिनिधी प्रमोद जावळे म्हणाले की, आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. सोमवारी झालेल्या निदर्शनांमध्ये प्रमोद जावळे, विठ्ठल पाटील, संजय वंजारे, संतोष गव्हाळे, चंद्रप्रकाश जमदाडे, गिरजाराम डक ले, कल्याण सोनवणे, अंकुश औटे, देवीदास पवार, नारायण घोडके, प्रकाश चव्हाण, बाळू सोनवणे, दीपा पैठणकर, राखी बत्तिसे, मनीषा कांबळे, मनीषा बत्तिसे आदींचा सहभाग होता.मागण्या अवास्तवरुग्णालयाचे संचालक डॉ. अनंत पंढेरे यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले की, डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे वेतन हे शहरातील अन्य रुग्णालयांपेक्षा अधिक आहे, असे असताना आम्ही ३ हजार ७०० रुपये पगारवाढ देऊ केली आहे. त्यासाठी संघटनेसोबत आमच्या २७ बैठका झाल्या. मात्र, कर्मचारी संघटनेने १३ हजार पगारवाढ मागितली आहे. कर्मचाऱ्यांच्या अवास्तव मागण्या प्रशासन मान्य करणार नाही.