शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

बारा बलुतेदार समाजाची निदर्शने

By admin | Updated: August 27, 2014 01:38 IST

बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बारा बलुतेदार महासंघ बीड शाखेच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी निदर्शने करण्यात आली

बीड : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बारा बलुतेदार महासंघ बीड शाखेच्यावतीने विविध मागण्यांसाठी मंगळवारी निदर्शने करण्यात आली. घोषणाबाजी करत शासनाचा निषेध कार्यकर्त्यांनी केला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात महासंघाने म्हटले आहे की, स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे पूर्ण झाली, तरीही बारा बलुतेदार, ११ आलुतेदार समाज हा विकासापासून वंचित आहे. गावगाडा चालविणारा, गावाला आकार देणारा समाज गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, आर्थिक व राजकीय दृष्टया मागासलेला आहे. या समाजाची उन्नती व्हावी, यासाठी कोणताही महत्वाकांक्षी निर्णय सरकारने यापूर्वी घेतलेला नाही. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे नेत्यांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे हा समाज आजही मुख्य प्रवाहाच्या बाहेरच आहे.अनेक बेरोजगार तरूण कामाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना आर्थिक योजना नसल्याने तुटपूंज्या रोजगारावरच आयुष्य जगावे लागत आहे. सरकारला जागे करण्यासाठी व्यापक आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी विविध मागण्या केल्या. बारा बलुतेदार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ तयार करावे, समाजातील निवृत्त कारागिरांना दोन हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे, बारा बलुतेदार समाजातील संतांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे, विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह बांधावे, तसेच लोकसभा, विधानसभा मतदारसंघामध्ये या समाजातील आरक्षित मतदारसंघ व राज्यसभा, विधानपरिषद सभागृहाचे सदस्यत्व देण्यात यावे. यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या. या आंदोलनात बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश कानगावकर, अ‍ॅड. संदीप बेदरे, नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे, अर्जुन दळे, कुलदीप जाधव, मोहन जाधव, गणेश शिंदे, दत्ता नलावडे, गणेश जगताप, रमाकांत पतंगे, द्वारकादास फटाले, रामचंद्र बेदरकर, उमेश राजगुरू, राजू ताटे, गुलाब चव्हाण, दिनेश टाकणखार, रामेश्वर वाघमारे, दत्ता जाधव, दत्ता व्यवहारे आदींसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)