शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदी, जीएसटीने अर्थव्यवस्था संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : नोटाबंदी आणि जीएसटीची चुकीच्या पद्धतीने केलेली अंमलबजावणी, हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील हल्ला असल्याची टीका काँग्रेसचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नोटाबंदी आणि जीएसटीची चुकीच्या पद्धतीने केलेली अंमलबजावणी, हा देशाच्या अर्थव्यवस्थेवरील हल्ला असल्याची टीका काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी येथे केली. चव्हाण शुक्रवारी जालना जिल्हा दौºयावर आले असता, येथील बीज शीतल सभागृहात त्यांनी व्यापारी, उद्योजक व शेतक-यांशी संवाद साधला.या वेळी माजी मंत्री शंकरराव राख, माजी आ. कैलास गोरंट्याल, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, कार्याध्यक्ष राजाभाऊ देशमुख, डॉ. संजय लाखे-पाटील, आर. आर. खडके, भीमराव डोंगरे, शहराध्यक्ष अब्दुल हफीज, विमल आगलावे, सतीश पंच, रमेशचंद्र तवरावाला, राजेंद्र राख यांची उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अर्थव्यवस्थेबाबत फारसा अभ्यास नाही. ‘एक कर एक देश’ ही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची संकल्पना होती. तेंव्हा मोदींनी यास कडाडून विरोध केला. मात्र, सत्तेत आल्यानंतर जीएसटीची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी सुरू करून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. काळा पैसा व भ्रष्टाचार रोखण्याच्या नावाखाली अचानक नोटबंदीचा निर्णय घेतला. हा निर्णय पूर्णपणे फसल्यानंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेसाठी नोटबंदी केल्याचे भासविण्यात आले. मुळात अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपन्यांना फायदा करून देण्यासाठी सरकार डिजिटल अर्थव्यवस्थेला प्राधान्य देत आहे. कॅशलेस पेमेंटचे सर्व कमिशन परदेशी कंपन्यांच्या तिजोरीत जात आहे. नोटबंदीच्या निर्णयाबाबत सरकारमध्ये असणाºया नेत्यांना माहिती होती. त्यांनी आपल्याकडील पैशाची योग्य विल्हेवाट लावल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. नोटबंदी व जीएसटीमुळे येणाºया काळात अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होणार आहे. त्यामुळे व्यापाºयांनी याचा विरोध करावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी यावेळी केले.सर्वच पातळ्यावर अपयशी ठरलेल्या या सरकारविरुध्द सामान्य जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. मराठवाड्यासह विदर्भात देखील मागील २ ते ३ वर्षांत शेतक-यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. फसवी कर्जमाफी करुन शेतक-यांना सतत झुलवत ठेवण्याचे काम होत आहे. कर्जमाफीबाबत दररोज वेगवेगळे शासन निर्णय काढून भाजपा सरकारने नवीन इतिहास घडवला असून, काँग्रेस आघाडीचे सरकार केंद्रात असताना पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मनमोहन सिंंग यांनी एका झटक्यात देशभरातील शेतकºयांना कर्जमाफीची घोषणा केली होती. मुळात भाजपा सरकारला शेतक-यांना कर्जमाफी द्यायचीच नाही, अशी परिस्थिती सरकारच्या एकूण कारभारावरुन दिसून येत आहे. वीज निर्मिती, वीज पुरवठा आणि वीज वितरणाचे काम या सरकारला जमलेले नाही.