अतिक्रमण हटविण्याची मागणी
By | Updated: November 29, 2020 04:04 IST2020-11-29T04:04:52+5:302020-11-29T04:04:52+5:30
गुलमंडीकडून कुंभारवाडा - अंगुरीबाग- सुपारी हनुमान मंदिरकडे जाणारा रस्ता जिथे एकत्र येऊन मिळतो त्या चौफुलीवर दुकानदार व हातगाडीवाल्यांनी ...

अतिक्रमण हटविण्याची मागणी
गुलमंडीकडून कुंभारवाडा - अंगुरीबाग- सुपारी हनुमान मंदिरकडे जाणारा रस्ता जिथे एकत्र येऊन मिळतो त्या चौफुलीवर दुकानदार व हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे दिवसा या रस्त्यावरून कधी जा वाहतूक जाम असते. याच चौफुलीवर गड्डा पडलेला आहे. तिथे वाहने स्लिप होतात. गेअर टाकण्याचा अंदाज न आल्याने वाहने बंद पडतात तेव्हा पाठीमागून येणारे वाहने समोरील वाहनाला धडकतात, असेही प्रकार घडत आहेत. अरुंद गल्ली व त्यात अतिक्रमण यामुळे येथे सतत वाहतूक जाम होत असते. पायी चालणेही कठीण जाते. अशीच परिस्थिती अँगुरीबाग ते सिटीचौकपर्यंतची आहे. या रस्त्याचे रुंदीकरणं करण्यात यावे, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.