शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

जायकवाडीचे पाणी सुखना धरण आणि परिसरातील तलावात आणण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 4:53 PM

तांत्रिक पाहणी करून प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा

ठळक मुद्देएक्स्प्रेस जलवाहिनी उपलब्ध 

- श्रीकांत पोफळे 

शेंद्रा (औरंगाबाद ) : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरणार असल्याने धरणाचे पाणी दुष्काळाच्या छायेत असणाऱ्या औरंगाबाद तालुक्यातील सुखना धरणात, तसेच करमाड-हिवरा तलावात सोडणे शक्य होईल का, याची तांत्रिक पाहणी करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. 

जायकवाडी धरण सध्या ९० टक्के भरले आहे. आणखी दीड महिना पावसाळा शिल्लक आहे, त्यामुळे ते पूर्ण क्षमतेने भरणार आहे. या परिस्थितीचा फायदा औरंगाबाद तालुक्याला मिळावा, असे औरंगाबाद तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटत आहे. औरंगाबाद तालुका सध्या दुष्काळाच्या छायेत असून, अनेक गावांत उन्हाळ्याप्रणाणे टँकर सुरू करण्यात आले आहे. या परिस्थितीत शेंद्रा एमआयडीसीपर्यंत आलेल्या एक्स्प्रेस जलवाहिनीद्वारे सुखना धरणात आणि करमाड-हिवरा शिवारातील तलावात पाणी सोडणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होईल का, याची पाहणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे का? पैठणहून शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसाठी सिंदोन-भिंदोनमार्गे एक्स्प्रेस जलवाहिनी टाकण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी या वाहिनीद्वारे शेंद्रा एमआयडीसीत पाणी येऊ लागले. सुखना धरणात चित्ते आणि सुखना या दोन नद्यांचे पाणी येते. या दोन्ही नद्यांतून धरणात पाणी येण्याच्या ठिकाणाजवळून ही एक्स्प्रेस वाहिनी गेली आहे. करमाड-हिवरा शिवारात असलेल्या जडगाव लघु पाटबंधारे तलावात पाणी येणाऱ्या नदीतून एक्स्प्रेस जलवाहिनी गेलेली आहे. यामुळे याच जलवाहिनीद्वारे जायकवाडी धरणातील पाणी सुखना धरणात सोडणे शक्य आहे का, याची तांत्रिक पाहणी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सुखना धरणाच्या अगदी जवळून एक्स्प्रेस जलवाहिनी गेल्याने सुखनामध्ये पाणी आणणे ही बाब फारशी खर्चिक ठरणार नाही, असे शेतकऱ्यांना वाटते. 

काय होईल फायदा?एक्स्प्रेस जलवाहिनीद्वारे सुखना धरणात पाणी आले तर  दुष्काळाच्या गडत छायेत असलेल्या औरंगाबाद तालुक्यातील जवळपास ६० गावांची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल. याशिवाय जवळपास २० गावांतील शेतकऱ्यांना रबी पिकेदेखील घेता येतील. या परिसरातील अनेक शेततळी कोरडी पडली आहेत. पाणी उपलब्ध झाल्यास फळबागा वाचतील. त्यामुळे जायकवाडीचे पाणी औरंगाबाद तालुक्यातील पूर्व भागातील धरण आणि तलावांत सोडले तर त्याचा शेतकऱ्यांना निश्चितपणे फायदा होणार आहे. 

धरणाची क्षमतासुखना धरणाची क्षमता २१.५ दशलक्ष घनमीटर इतकी आहे, तर हिवरा तलावाची क्षमता सुखना धरणाच्या एक टक्का इतकी आहे. दोन्ही ठिकाणी पाणी सोडले तर जायकवाडीच्या पाण्याची किंचितशी घट होणार आहे. त्यामुळे या मागणीचा तांत्रिक पाहणीच्या दृष्टीने विचार व्हावा आणि शेतकऱ्यांंना पाणी द्यावे, अशी मागणी श्रीमंत चौधरी, मुरलीअण्णा चौधरी, शैलेश चौधरी, शिवाजी भोसले, अनिल चौधरी, सुनील चौधरी, भास्कर चौधरी, संतोष पवार, शाम पवार, कल्याण पोफळे, शिवाजी भोसले, जयाजी सरोदे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.

अधिकारी, अभियंत्यांचे मतकरमाड परिसरातील शेतकऱ्यांच्या या मागणीसंदर्भात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांंना विचारले असता त्यांनी अशा पध्दतीने एक्स्प्रेस जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याबाबत काही सांगण्यास असमर्थता दर्शविली. शेतकऱ्यांची मागणी असेल तर त्याबाबत जिल्हाधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी निर्णय घेऊ शकतील, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सुखना धरणाच्या जवळून गेलेल्या एक्स्प्रेस जलवाहिनीतून सुखना धरणात पाणी सोडणे शक्य आहे की नाही याबाबत तांत्रिक माहिती घ्यावी लागेल. तांत्रिक माहितीशिवाय काहीही सांगता येणार नाही. 

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबादWaterपाणीFarmerशेतकरी