रोहिदास त्रिभुवन यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, विरगाव शिवारातील गट क्रमांक २९ मध्ये त्यांची ०.६५ आर शेतजमीन असून, त्यांना दुष्काळी अनुदानापोटी चार हजार २०० रुपये शासकीय मदत मिळाली आहे. याउलट ०.४० आर क्षेत्र असणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळाले आहेत. काही जणांना ०.६८ आर शेतजमीन असून, त्यांना ०.५८ आर क्षेत्राचे पाच हजार ८०० रुपये मदत मिळाली आहे. एक हेक्टर ३४ आर शेतजमीन असलेल्यांना केवळ एक हेक्टरचे दहा हजार रुपये मदत देण्यात आली आहे. अशा प्रकारे तलाठ्याने सर्व याद्या तयार करताना मंजूर यादीत घोळ केल्याने पात्र शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. त्यांचा लहान भाऊ यांना ०.७२ आर बागायती क्षेत्र असताना केवळ ०.४६ आर क्षेत्राचे पैसे देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. संपूर्ण मंजूर यादीची चौकशी करून गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्रिभुवन यांनी केली आहे.
फोटो : दुष्काळी अनुदान निधीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी या मागणीसाठी उपोषणास बसलेले राेहिदास त्रिभुवन.