जलयुक्त अभियानातील निकृष्ट बंधारा बांधकामांच्या चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:07 AM2021-02-23T04:07:25+5:302021-02-23T04:07:25+5:30

जलयुक वैजापूर : जलसंधारण विभागातर्फे २०१७-१८ मध्ये जलयुक्त अभियानांंतर्गत केलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यांंची कामे निकृष्ट असून त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे ...

Demand for Inquiry into Inferior Dam Construction in Jalayukta Abhiyan | जलयुक्त अभियानातील निकृष्ट बंधारा बांधकामांच्या चौकशीची मागणी

जलयुक्त अभियानातील निकृष्ट बंधारा बांधकामांच्या चौकशीची मागणी

googlenewsNext

जलयुक

वैजापूर : जलसंधारण विभागातर्फे २०१७-१८ मध्ये जलयुक्त अभियानांंतर्गत केलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्यांंची कामे निकृष्ट असून त्यामध्ये दुरुस्ती करण्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी सुचवले आहे. त्यामुळे ही कामे दर्जात्मक झाली असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे जलसंधारणाच्या कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सवंदगाव येथील निवृत्ती सोनवणे यांनी केली. त्यांनी माहिती अधिकारात मिळविलेल्या कागदपत्रांवरून ही मागणी केली.

२०१७-१८ या कालावधीत तालुक्यातील तीस गावात जलयुक्त अभियानातून सिमेंट बंधाऱ्यांची कामे झाली आहेत. याबाबत सवंदगाव येथील निवृत्ती सोनवणे यांनी बांधकामाबद्दल माहिती अधिकार टाकून माहिती घेतली. माहिती अधिकारात सांगण्यात आले की, सोळा गावांत सविस्तर सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण करून कार्यारंभ आदेश देण्यात आले. सोळापैकी पंधरा सिमेंट बंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. मात्र, त्रयस्थ यंत्रणेच्या अहवालानुसार बिलोणी, नारळा, बाभुळगाव, सुदामवाडी, डागपिंपळगाव व नागमठाण येथे करण्यात आलेली बंधाऱ्यांची कामे निकृष्ट झाली आहेत. त्यांची दुरुस्ती करण्याचे सुचविले आहे.

दरम्यान, या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला, असा आरोप तक्रारदार सोनवणे यांनी केला.

Web Title: Demand for Inquiry into Inferior Dam Construction in Jalayukta Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.