पदवी, पदव्युत्तरचे प्रवेश ‘क्लोज’
By Admin | Updated: August 10, 2014 02:02 IST2014-08-10T02:01:57+5:302014-08-10T02:02:56+5:30
बीड: मागील दोन महिन्यापासुन महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडत होती. ही झुंबड शनिवारी बंद झाली. पदवी व पदव्यूत्तर अभ्

पदवी, पदव्युत्तरचे प्रवेश ‘क्लोज’
बीड: मागील दोन महिन्यापासुन महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडत होती. ही झुंबड शनिवारी बंद झाली. पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची अंतीम तारीख शनिवारी होती. विद्यार्थ्यांनी यापूर्वीच प्रवेश निश्चीत केले असल्याने शनिवारी जास्त गर्दी दिसून आली नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठ, औरंगाबाद अंतर्गत मागील दोन महिन्यापासून शहरातील विविध महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू होती. प्रवेशासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात गर्दी करू लागले होते. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पदवीत प्रवेश घेण्यासाठी व पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पदव्यूत्तर शिक्षण घेण्यासाठी विविध महाविद्यालयात प्रवेशासाठी गर्दी केली होती. आकरावी-बारावीच्या प्रवेशासाठी एक स्वतंत्र व पदवी, पदव्यूत्तरच्या प्रवेशासाठी एक स्वतंत्र प्रवेश समिती नेमण्यात आली होती.
गतवर्षीच्या तुलनेत यावेळी विज्ञान शाखेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे बलभीम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत सानप यांनी सांगितले.
पुर्वी व्यवसायीक अभ्यासक्रमांकउे जास्त ओढा नव्हता. मात्र आता यामध्ये बदल झाला असून व्यवसायीक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन एखाद्या खाजगी कंपनीत कशी नोकरी मिळेल यासाठी प्रत्येकजन धडपड करू लागला असल्याचेही त्यांनी सांगिले. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर नोकरी मिळण्याची खात्री असते तसेच यामाध्यमातून स्वत:ला सिद्ध करण्याची मानसिकता असल्यास विद्यार्थी उंच भरारी घेऊ शकतो असेही डॉ. सानप यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी होणारी गर्दी पाहता यावर्षी २० टक्के कोठा जास्तीचा देण्याची मागणी केली होती आणि याला विद्यापिठाने मान्यताही दिली असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)