शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी देगलूरकरांचे हाल

By admin | Updated: May 13, 2014 01:03 IST

देगलूर : व्हीटी पंपाची नादुरूस्ती, कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा अशा अनेक कारणांमुळे देगलूर शहरातील जनतेचे पिण्याच्या पाण्याअभावी बेहाल होत आहेत़

देगलूर : व्हीटी पंपाची नादुरूस्ती, कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पाणीपुरवठा अशा अनेक कारणांमुळे देगलूर शहरातील जनतेचे पिण्याच्या पाण्याअभावी बेहाल होत आहेत़ देगलूर शहराला शहरापासून ११ कि़मी़ अंतरावर असलेल्या करडखेड मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो़ शहराच्या टाकीत पाणी आणण्यासाठी दोन व्हीटी पंप ओहत़ दोन्ही पंप चालू असतील तरच शहराच्या जलकुंभात आवश्यक तेवढा जलसाठा केला जावू शकतो़ यावर्षी सुदैवाने करडखेड मध्यम प्रकल्पात बर्‍यापैकी जलसाठा उपलब्ध आहे़ परंतु व्हीटी पंपात सतत होत असलेल्या बिघाडामुळे, कमी दाबाने होत असलेल्या विद्युत पुरवठ्यामुळे अनंत अडचणी निर्माण होत आहेत़ देगलूर शहरात गेल्या काही वर्षांपासून विषम दाबाने पाणीपुरवठा होत आहे़ शहराच्या काही भागातील नळांना दुसर्‍या मजल्यावर चढेल एवढ्या दाबाने पाणी येते, तर शिवनगर, सद्गुरूनगर, ओमनगर, बापूनगर, दत्तनगर, सुभाषनगर, दत्तमंदिर परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येते़ या ठिकाणी काही मंडळी विद्युत मोटारीने पाणी ओढून घेतात, त्यामुळे अनेकांचे नळ ठणठणीत असतात़ गेल्या १५-२० दिवसांपासून शहराला वेगवेगळ्या कारणामुळे आवश्यक तेवढा व योग्यवेळी पाणीपुरवठा होत नसल्यामुळे ज्यांच्या घरी बोअर नाही, अशा हजारो नागरिकांना पाण्यासाठी दारोदार भटकावे लागत आहे़ ऩ प़ प्रशासनाच्या अत्यंत शिथिल कारभारामुळे जनता वैतागून गेली आहे़ (वार्ताहर)