डिफेन्स करिअर अकॅडमीची १३ एप्रिलला प्रवेश परीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 07:31 IST2025-04-12T07:31:35+5:302025-04-12T07:31:51+5:30
Chhatrapati Sambhajinagar: मराठवाडा व छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड यश मिळवल्यानंतर राज्यातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमी आता कोल्हापुरातही सुरू झाली आहे.

डिफेन्स करिअर अकॅडमीची १३ एप्रिलला प्रवेश परीक्षा
छत्रपती संभाजीनगर - मराठवाडा व छत्रपती संभाजीनगर शहरात प्रचंड यश मिळवल्यानंतर राज्यातील नामांकित सैनिकी प्रशिक्षण संस्था डिफेन्स करिअर अकॅडमी आता कोल्हापुरातही सुरू झाली आहे. कोल्हापूरमध्ये इयत्ता ५ वी ते १० वी व ११ वी, १२ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी येत्या रविवारी, १३ एप्रिल रोजी महत्त्वपूर्ण प्रवेश परीक्षा आयोजित केली आहे.
सांगली-कोल्हापूर हायवेवरील चौंडेश्वरी कॉटन मिलजवळ, चिपरी, ता. शिरोळ येथे माय स्कूलच्या विशाल कॅम्पसमध्ये ५ वी ते १० वी सीबीएसई आणि स्टेट बोर्ड (इंग्रजी माध्यम) आणि ११ वी आणि १२ वीपर्यंतच्या शिक्षणाची सुविधा आहे. शिस्तबद्ध सैनिकी प्रशिक्षणाच्या माध्यमातून डिफेन्स करिअर अकॅडमीने आजपर्यंत हजारो युवकांचे भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले आहे.
येत्या रविवारी, १३ एप्रिल रोजी ५ वी ते १० वी व ११ वी, १२ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा होत आहे. विद्यार्थ्यांनी सकाळी ८ वाजता कॅम्पसमध्ये पोहोचावे परीक्षा प्रक्रिया व फिजिकल टेस्ट दुपारी ४ पर्यंत झाल्यानंतर त्वरित निकाल जाहीर केले जातील. उत्तीर्ण विद्यार्थांना केवळ १० हजार रुपये भरून आपला प्रवेश निश्चित करता येईल, अशी माहिती अकॅडमीचे संचालक प्रा. डॉ. केदार राहणे यांनी केले आहे. (वा. प्र.)