शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वंचितच्या उमेदवाराचा पराभव, भाजप आमदाराद्वारे ईव्हीएममध्ये गडबडीचा आरोप; प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 14:12 IST

आमदार नारायण कुचे यांच्या घराच्या दिशेने जाण्याचा आंदोलकांचा प्रयत्न, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज

छत्रपती संभाजीनगर : वंचितचे उमेदवार सतीश गायकवाड यांचा शेवटच्या फेऱ्यांमध्ये ७६९ मतांनी पराभव झाला. आमदार नारायण कुचे यांच्या हस्तक्षेपानंतर ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केल्याचा आरोप गायकवाड यांनी करत निकालावर आक्षेप घेतला. यानंतर हजारो समर्थकांनी मतमोजणी केंद्रात घुसून प्रवेशद्वारावरच ठिय्या देत घोषणाबाजी केल्याने तासभर मतमोजणी केंद्राचा प्रवेश बंद करावा लागला.

सतीश गायकवाड हे प्रभाग २४ (अ) मधून वंचितचे उमेदवार होते. गरवारे आयटी पार्क मतमोजणी केंद्रात दुपारी ३:३० वाजेनंतर अंतिम टप्प्यातील मतमोजणीत गंगाबाई भवरे ७३७३ मत मिळवून विजयी झाल्या. गायकवाड यांना ६६०४ मते मिळाल्याचे अधिकाऱ्यांनी घोषित केले. मात्र, कुचे यांच्या सूचनेवरून ईव्हीएम मशीन बदलून गडबड करण्यात आल्याचा आरोप करत गायकवाड यांनी करीत पुनर्मोजणीची मागणी केली. ही मागणी अमान्य झाल्याने सुरक्षा जाळीवर चढून गायकवाड यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षेत उडी मारली आणि केंद्रात गोंधळ उडाला. भवरे यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान करताना गायकवाड यांनी आक्षेप घेतल्याने तणाव वाढला होता.

हजारो समर्थक मतमोजणी केंद्रात घुसलेही वार्ता कळताच गायकवाड यांचे हजारो समर्थक केंद्राबाहेर दाखल झाले. पोलिसांनी मज्जाव करूनही संतप्त जमावाने आत प्रवेश केला. यावेळी चांगलीच धक्काबुक्की झाली. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी तासभर ठिय्या दिल्याने मतमोजणी केंद्राचे मुख्य प्रवेशद्वार बंद करावे लागले. पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी जमावाला शांत राहण्यासाठी आव्हान केले. मात्र, जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. तणाव वाढल्याने पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनास्थळी येत समजावण्याचा प्रयत्न केला.

सौम्य लाठीचार्ज, परिस्थिती नियंत्रणातगायकवाड यांनी स्वत: केंद्राबाहेर येत शांततेचे आव्हान केल्याने हजारोंचा जमाव कलाग्राममार्गे पायीच संघर्षनगरच्या दिशेने निघाला. यावेळी आमदार कुचे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. जवळपास २ ते ३ हजारांच्या जमावामुळे जालना रोडची एक बाजू खोळंबली होती. त्यातच काही तरुणांनी मुकुंदवाडी गावाच्या दिशेने जात कुचे यांच्या घराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच सौम्य लाठीचार्ज केल्याने त्यांचा प्रयत्न फसला. त्यानंतर संघर्षनगरमध्ये मोर्चा नेण्यात आला. आपला नगरसेवक, मनातला नगरसेवक असे फलक लावण्यात आले. त्यानंतर गायकवाड यांनी शांततेचे आव्हान करून समर्थकांना संबोधित केले. निकालाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची घोषणा गायकवाड यांनी केल्यानंतर तणाव निवळला. मात्र, या घटनेमुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Vanchit candidate loses, BJP MLA accused of EVM tampering.

Web Summary : Vanchit's Gaikwad lost by 769 votes, alleging EVM tampering by a BJP MLA. Supporters protested, demanding recounting, leading to clashes and a brief police intervention before Gaikwad appealed for calm. Tension eased after the announcement of court appeal.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल २०२६Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी