शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
6
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
7
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
8
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
9
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
10
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
11
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
12
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
13
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
14
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
15
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
16
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
17
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
18
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
19
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
20
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
Daily Top 2Weekly Top 5

कपातीचे धोरण

By admin | Updated: July 28, 2014 01:00 IST

नांदेड : महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी व खर्चात बचत करण्यासाठी शहरातील सहा ऐवजी चार क्षेत्रीय कार्यालय स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़

नांदेड : महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी व खर्चात बचत करण्यासाठी शहरातील सहा ऐवजी चार क्षेत्रीय कार्यालय स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला आहे़ व्यापाऱ्यांच्या भूमिकेमुळे एलबीटीमुळे मनपाचे उत्पन्न घटले असून पारगमन शुल्क वसुलीतून विशेष महसूल मिळत नाही़ यासाठी महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत़ या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील सहा क्षेत्रीय कार्यालयांची संख्या घटविण्याचा विचार केला असून त्याद्वारे खर्च कपातीचे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे़ शहरात झोन क्रं़ १ शिवाजीनगर, झोन क्रं़ २ अशोकनगर, झोन क्रं़ ३ इतवारा, झोन क्रं़ ४ वजिराबाद, झोन क्रं़ ५ सिडको व झोन क्रं़ ६ तरोडा अशी सहा क्षेत्रीय कार्यालये सुरू आहेत़ याठिकाणी असलेले कर्मचारी व कार्यालयाचा वाढता खर्च कमी करण्याच्या उद्दिष्टाने दोन क्षेत्रीय कार्यालये कमी करून त्यांचे कामकाज विभागून चार क्षेत्रीय कार्यालयाकडे सोपविण्यात येणार आहे़ या निर्णयामुळे क्षेत्रीय कार्यालयांवर होणारा खर्च कमी होवून हा खर्च मनपाच्या तिजोरीत जमा होणार आहे़ प्रशासनाने याबाबत प्रस्ताव तयार केला असून लवकरच तो सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी येणार आहे़ दरम्यान, महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी शहरात महत्वाच्या ठिकाणी एकूण साडेचारशे गाळे निर्माण करण्यात येत आहेत़तसेच बांधकाम परवान्यातून महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत़ सध्या बांधकाम परवान्यातून अडीच कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे़ (प्रतिनिधी)