लम्पी स्किन आजारामुळे घटली दुधाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 18:59 IST2020-09-27T18:58:00+5:302020-09-27T18:59:36+5:30
खुलताबाद तालुक्यातील गुरांना लम्पी स्किन आजाराची लागण झाल्यामुळे अनेकांनी दुध घेणे बंद केले आहे. यामुळे दुधउत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

लम्पी स्किन आजारामुळे घटली दुधाची मागणी
सुनील घोडके
औरंगााबाद : खुलताबाद तालुक्यातील गुरांना लम्पी स्किन आजाराची लागण झाल्यामुळे अनेकांनी दुध घेणे बंद केले आहे. यामुळे दुधउत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून जनावरांना लम्पी स्किन या संसर्गजन्य आजाराची लागण होऊन त्यांच्या अंंगावर सर्वत्र फोड झालेले दिसत आहे. दुधाळी जनावरे या आजाराने मोठ्या प्रमाणावर ग्रासली असल्यामुळे खुलताबाद शहर परिसरातील अनेक लोकांनी गायी, म्हैस यांचे दुध घेणे बंद केले आहे.
याबाबत जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती एल. जी. गायकवाड यांनी या आजाराबाबत पशु वैद्यकीय दवाखान्यात जनावरांंचे लसीकरण करण्यासाठी औषधी उपलब्ध करून देऊन उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.