शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
2
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
3
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
4
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
6
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
7
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
8
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
9
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
10
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
11
Raja Shivaji Trailer: सगळ्यांच्या छाताडावर पाय रोवून हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहतोय आम्ही...; छत्रपतींच्या भूमिकेत रितेशची गर्जना, पाहा ट्रेलर
12
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
13
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
14
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
15
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
16
Bhuban Badyakar : 'कच्चा बादाम' फेम भुबन बड्याकरची मोठी फसवणूक; मनोरंजन सृष्टीतील लोकांनी स्वप्नं दाखवली अन्...
17
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
18
महामार्गांवर नो पार्किंग; ढाबे आणि हॉटेल्सवरही बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
19
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
20
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
Daily Top 2Weekly Top 5

टंचाई नव्हे, जिल्ह्यात दुष्काळच जाहीर करा

By admin | Updated: August 15, 2014 01:34 IST

जालना : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात राज्य शासनाने केवळ टंचाईसदृश स्थिती जाहीर न करता दुष्काळ जाहीर करावा, अशी सर्वपक्षीय मागणी जिल्हा परिषदेच्या

जालना : अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यात राज्य शासनाने केवळ टंचाईसदृश स्थिती जाहीर न करता दुष्काळ जाहीर करावा, अशी सर्वपक्षीय मागणी जिल्हा परिषदेच्या गुरूवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आली. या सभेत दुष्काळी परिस्थितीवरच चर्चा करून सदस्यांनी काही सूचनाही केल्या.कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी २.३० वाजता सभा सुरू झाली. अध्यक्षस्थानी अध्यक्षा आशाताई भुतेकर होत्या. तर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपाध्यक्ष राहुल लोणीकर, शिक्षण व आरोग्य सभापती वर्षा देशमुख, महिला व बालकल्याण सभापती शीतल गव्हाड, कृषी सभापती बप्पासाहेब गोल्डे, समाजकल्याण सभापती रुख्मीणीताई राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, पी.टी. केंद्रे, कॅफो चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी विरोधी सदस्यांनी सभेला अनुपस्थित अधिकाऱ्यांची यादी करा, अशी मागणी केली. प्रत्येकवेळी काही अधिकारी जाणीवपूर्वक गैरहजर राहतात, असा आरोपही करण्यात आला. एवढेच नव्हे तर विरोधी सदस्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची हजेरीच घेतली. गैरहजर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सतीश टोपे, राजेश राठोड यांनी केली. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कोणत्या उपाययोजना केल्या, असा सवाल विरोधकांनी केला. त्यावर टंचाईग्रस्त भागात ३९ टँकर सुरू असून १५१ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता तांगडे यांनी दिली. उन्हाळ्यात टंचाईग्रस्त भागात केलेल्या नियोजनाअंतर्गत १ कोटी १६ लाख रुपये खर्च झाला. मात्र दुष्काळी परिस्थितीचे सर्वेक्षण झाले का, दुष्काळ निवारणासाठीचा प्लॅन तयार आहे का, असे विविध प्रश्न विरोधी सदस्यांनी केले. भूजल अधिकारी एकच आहे, असे सांगताच सत्ताधारी व विरोधी सदस्य संतप्त झाले. अनिरूद्ध खोतकर म्हणाले, भूजल अधिकारी एकच आहे, मग आम्ही सर्वे करायचा का? आणखी भूजल अधिकाऱ्यांची गरज असल्याचे शासनाकडे लेखी कळविले का? असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)