महाराष्ट्राचा १४ वर्षांखालील संघ जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:51 IST2018-01-22T00:50:45+5:302018-01-22T00:51:02+5:30
गुजरात येथे २३ जानेवारीपासून सुरू होणाºया १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय तीन दिवसीय सामन्यांसाठी महाराष्ट्राचा १४ वर्षांखालील क्रिकेट संघ पुणे येथे नुकताच जाहीर झाला आहे.

महाराष्ट्राचा १४ वर्षांखालील संघ जाहीर
औरंगाबाद : गुजरात येथे २३ जानेवारीपासून सुरू होणाºया १४ वर्षांखालील पश्चिम विभागीय तीन दिवसीय सामन्यांसाठी महाराष्ट्राचा १४ वर्षांखालील क्रिकेट संघ पुणे येथे नुकताच जाहीर झाला आहे. जाहीर झालेल्या संघात मराठवाड्यातील खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे बीडचा सचिन धस हा संघाचे उपकर्णधारपद भूषवणार आहे. या संघात उस्मानाबादचा अनुराग कवडे, आदिनाथ प्रभाळकर आणि मूळचा औरंगाबादचा असणारा; परंतु व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीच्या ओमकार राजपूत यांचा समावेश आहे. महाराष्ट्राची पहिली लढत मुंबईविरुद्ध २३ ते २५ जानेवारीदरम्यान होत आहे.
१४ वर्षांखालील महाराष्ट्राचा संघ : यश बोरामणी (कर्णधार), सचिन धस (उपकर्णधार), अरशन कुलकर्णी, अक्क्षण काझी, मुस्तानसीन काचवाला, तिलक जाधव, ओमकार राजपूत, अनुराग कवडे, चैतन्य बिरामने, आदिनाथ प्रभाळकर, मिर्झा बेग, अभिषेक निशाद, रोहन वाघसरे, विठ्ठल चौधर, अनिष जगताप, सुदर्शन कुंभार. प्रशिक्षक : अजय चव्हाण, संघ व्यवस्थापक : राजू काणे.