शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कृषी प्रदर्शनाच्या पत्रिकेवरून सेनेतील वाद चव्हाट्यावर

By admin | Updated: December 15, 2014 00:49 IST

विजय गायकवाड, वैजापूर येथील शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

विजय गायकवाड, वैजापूरयेथील शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. बाजार समितीचे उपसभापती भागीनाथ मगर यांनी पक्षविरोधी काम करण्याचा सपाटा लावल्याने त्यांना या पदावरून हटविण्याची एकमुखी मागणी सेनेच्या संचालकांनी सभापती अ‍ॅड. आसाराम रोठे यांच्याकडे केली आहे. त्यांनी शिऊर येथे होणाऱ्या कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रम पत्रिकेत सेनेच्याच नेत्यांची नावे वगळल्याने हा वाद उफाळून आला आहे, असे बोलले जाते. यासंदर्भात अ‍ॅड. रोठे यांच्याकडे सेनेच्या ११ संचालकांनी उपसभापती भागीनाथ मगर यांची लेखी तक्रार केली आहे. मगर हे पक्षाच्या व बाजार समितीच्या हिताच्या विरोधात भूमिका घेत आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ही अयोग्य असल्याचे संचालकांनी म्हटले आहे.दरम्यान, तालुक्यातील शिऊर येथे श्रीसंत शंकरस्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १५ ते १९ डिसेंबर या दरम्यान आयोजित कृषी प्रदर्शन हे कळीचा मुद्दा ठरल्याने या वादाला तोंड फुटले आहे. शिऊर येथे उपबाजार समिती असून, या आवारात १५ ते १९ दरम्यान कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उपसभापती भागीनाथ मगर यांनी सेनेचे नेते अथवा बाजार समितीचे सभापती व अन्य कोणत्याही संचालकांना विश्वासात न घेता आपले घोडे दामटविले. त्यांनी या कार्यक्रमाची सूत्रे आपल्या हाती घेत पत्रिका छापल्या; परंतु सेनेचे वरिष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांना यात कोणतेही स्थान न देता त्यांना डावलण्यात आले. त्यातच विरोधी पक्षाच्या नेत्यांना या निमंत्रणपत्रिकेत मानाचे स्थान देण्यात आल्याने सेनेत चलबिचल झाली अन् वादाला तोंड फुटले. त्यामुळे बाजार समितीचे संचालक दीपक राजपूत, भाऊसाहेब गलांडे, कल्याण जगताप, महावीर बाफना, अनिल आल्हाट, सुनील कदम, विजयसिंह बोडखे, गोकुळ आहेर, मंदाताई कर्डक, अशोक पगारे व ज्ञानेश्वर जगताप यांनी ागर यांची पदावरून उचलबांगडी करण्याची मागणी केली. या मानापमान नाट्यामुळे कृषी प्रदर्शन उद्घाटनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.