शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

बीड बायपासवर आणखी किती बळी हवेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 11:47 AM

विश्लेषण : या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून सतत प्राणांतिक अपघात घडत आहेत. जानेवारी ते आजपर्यंत १० प्राणांतिक अपघात घडले. या अपघातात अकरा जणांचे बळी गेले.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी आणि अन्य सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सर्व्हिस रस्त्याचे काम रखडले पोलिसांनी जड वाहनांना सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ५ ते ९ या कालावधीसाठी प्रवेशबंदी केली.

- बापू सोळुंके 

बीड बायपासवरील अपघात रोखण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून सतत प्रयत्न होतात. मात्र, लोकप्रतिनिधी आणि अन्य सरकारी यंत्रणांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बायपासवरील सर्व्हिस रस्त्याचे काम रखडले आहे. परिणामी बायपासवर घडणाऱ्या प्राणांतिक अपघातांची मालिका सुरूच आहे. बुधवारी एका अपघातात दुचाकीस्वार दोन मुलांचा बळी गेला. बायपासवर आणखी किती बळी हवेत, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

बीड बायपासच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती निर्माण झाल्या. त्यासोबतच या रस्त्यावर मंगल कार्यालये, हॉटेल्स, मोठी रुग्णालये आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यत: जालना रोडला पर्याय म्हणून बीड बायपास ओळखला जातो. आता हा रस्ता वळण रस्ता न राहता शहरातील अंतर्गत रस्त्याचाच भाग झाला आहे. या रस्त्यावरून बायपास ओलांडून दुचाकी अथवा लहान कारने शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. यात दुचाकीस्वारांची संख्या अधिक आहे. या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून सतत प्राणांतिक अपघात घडत आहेत. जानेवारी ते आजपर्यंत १० प्राणांतिक अपघात घडले. या अपघातात अकरा जणांचे बळी गेले. आजच्या घटनेत दोन मुलांचा मृत्यू झाला. बायपासवरील अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जड वाहनांना सकाळी ८ ते ११ आणि दुपारी ५ ते ९ या कालावधीसाठी प्रवेशबंदी केली. मात्र, ही प्रवेशबंदीच आता वाहनचालकांच्या जिवावर उठल्याचे दिसून येते. प्रवेशबंदीच्या कालावधीत सुमारे तीनशे ते साडेतीनशे ट्रक, हायवा आणि अन्य मोठी वाहने अडवून ठेवली जातात. प्रवेशबंदीचा कालावधी संपताच जड वाहनांचे चालक वेगात बायपासवर येतात. 

या वाहनचालकांमध्ये पुढे जाण्यासाठी आपसात जणू स्पर्धाच सुरू होते. यामुळे बायपास जड वाहनांनी व्यापून जातो. बायपासवर जड वाहनांचे चालक दुचाकी आणि कारसाठी एकही लेन शिल्लक ठेवत नाहीत. बायपासवर वर्षभरात झालेले बहुतेक प्राणांतिक अपघात हे जड वाहनांमुळेच झाले असून, या अपघातात दुचाकीस्वारांचेच बळी गेले आहेत. बायपासवरील वाढत्या अपघातांची संख्या पाहून पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पुढाकार घेऊन बायपासवरील  सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस आयुक्तांच्या रेट्याखाली महिनाभर मनपा आणि जागतिक बँक अधिकाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले.

सर्व्हिस रस्त्यासाठी सुमारे तीनशे कोटींचा प्रस्ताव तयार केला. मात्र, राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रस्ताव शासनाकडे पडून आहे.  शासनाने निधी मंजूर न केल्याने बायपासच्या सर्व्हिस रस्त्याचे काम रखडले आहे. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी यासाठी मनापासून पुढाकार घेतला तर अशक्य काहीच नाही. शासनाकडून ३०० कोटी रुपये मंजूर करून आणल्यास सर्व्हिस रोडचा प्रश्न मार्गी लागून बायपासवरील आजच्या सारखा प्राणांतिक अपघात टाळता आला असता. मात्र, लोकप्रतिनिधींना आणखी किती बळी हवेत, असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसरAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाPoliceपोलिस