आजारी मुलाला भेटण्यास निघालेल्या वडिलांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 23:55 IST2018-12-07T23:54:44+5:302018-12-07T23:55:23+5:30
आजारी मुलाला कुटुंबासह भेटण्यासाठी निघालेल्या वडिलांचा रस्त्यात हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.

आजारी मुलाला भेटण्यास निघालेल्या वडिलांचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्नड : आजारी मुलाला कुटुंबासह भेटण्यासाठी निघालेल्या वडिलांचा रस्त्यात हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली.
ललितकुमार आत्माराम ठाकूर (४५, रा.धुळे, ह.मु. चंद्र्रलोकनगरी, कन्नड), असे मयताचे नाव आहे. ठाकूर हे महावितरण कंपनीत आॅपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांचा मोठा मुलगा शिक्षणानिमित्त नाशिकला आहे.
तो आजारी असल्याने भेटण्यासाठी पत्नी व मुलासह चारचाकी वाहनाने जात असताना चाळीसगाव घाट उतरल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले. तिथेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील असा परिवार आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.