हौदात पडून चिमुकलीचा मृत्यू
By Admin | Updated: May 16, 2016 23:33 IST2016-05-16T23:29:49+5:302016-05-16T23:33:18+5:30
आष्टी : घरासमोर खेळत असताना हौदात पडून चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना येथील मुर्शदपूर भागातील सावतानगरात सोमवारी घडली.

हौदात पडून चिमुकलीचा मृत्यू
आष्टी : घरासमोर खेळत असताना हौदात पडून चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना येथील मुर्शदपूर भागातील सावतानगरात सोमवारी घडली.
समृध्दी संदीप धोंडे असे त्या मुलीचे नाव आहे. ती घरासमोरील अंगणात खेळत होती. जवळच पाण्याचा हौद असून, टंचाईमुळे त्यात पाणी साठवून ठेवले होते. खेळताखेळता समृद्धी हौदाकडे गेली. हौदाच्या कठड्यावर चढून तिने आत डोकावले. त्यानंतर तिचा तोल जाऊन ती आत कोसळली. दरम्यान, अर्ध्या तासानंतर नातेवाईकांनी तिला पाहिले. परंतु तोपर्यंत तिने प्राण सोडले होते. (वार्ताहर)