औरंगाबादेत वाळूच्या साठ्यात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 12:54 IST2018-04-04T12:53:48+5:302018-04-04T12:54:32+5:30

हडको येथील रिकाम्या जागेत टाकलेल्या अवैध वाळू साठ्यात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली.

dead Body found in sand storage in Aurangabad | औरंगाबादेत वाळूच्या साठ्यात आढळला मृतदेह

औरंगाबादेत वाळूच्या साठ्यात आढळला मृतदेह

औरंगाबाद : हडको येथील रिकाम्या जागेत टाकलेल्या अवैध वाळू साठ्यात आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी सिडको पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी कि, हडको एन - १२ येथील राष्ट्रवादी भवन शेजारील जागेत शेख राजू हा अवैध रित्या वाळू साठा करतो. या वाळू साठ्यातील वाळू नेण्यासाठी आज सकाळी शेख यांचे मजूर आले होते. यावेळी फावड्याने वाळू काढत असताना त्यांना त्यात एक मृतदेह दडलेला आढळून आला. यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती सिडको पोलिसांनी दिली. माहिती मिळताच एसीपी नागनाथ कोडे व पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहास उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालय घाटी येथे पाठविण्यात आले आहे. 

दरम्यान, मृतदेहाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून मृताचे नाव समाधान किसन मस्के असे आहे. तो सिडको एन-११ येथील रहिवासी आहे.  

Web Title: dead Body found in sand storage in Aurangabad