शेद्रा एमआयडीसी परिसरात बेवारस कारमध्ये आढळला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 14:14 IST2019-02-11T14:14:09+5:302019-02-11T14:14:55+5:30
मुकुंदवाडी येथील प्रकाश कडुबा कासारे (४८ ) असे मृताचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

शेद्रा एमआयडीसी परिसरात बेवारस कारमध्ये आढळला मृतदेह
औरंगाबाद : शेंद्रा एमआयडीसीत मुख्य रस्त्यावरील एका कंपनी समोर उभ्या असलेल्या बेवारस कारमध्ये एका 48 वर्षीय इसमाचा मृतदेह आस्ज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आढळून आला. मुकुंदवाडी येथील प्रकाश कडुबा कासारे (४८ ) असे मृताचे नाव असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, मृत कासारे हे मुकुंदवाडी येथील रहिवासी असून मृतदेहावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नसल्याची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पी.आय. सत्यजित ताईतवाले यांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.