शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते अपघातात दिवसाआड एकाचा बळी

By admin | Updated: December 31, 2015 00:55 IST

गणेश खेडकर , औरंगाबाद शहरात दररोज सरासरी दोन रस्ते अपघात होऊन दिवसाआड एकाचा जीव जातो. ही माहिती पोलिसांच्या आकडेवारीवरूनच समोर आली असून, जानेवारी ते नोव्हें

गणेश खेडकर , औरंगाबादशहरात दररोज सरासरी दोन रस्ते अपघात होऊन दिवसाआड एकाचा जीव जातो. ही माहिती पोलिसांच्या आकडेवारीवरूनच समोर आली असून, जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांत ५९१ अपघात होऊन तब्बल १४९ जणांचा बळी गेला. ६२४ लोक या विविध अपघातांमध्ये जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मे महिन्यात सर्वात जास्त ६३ तर एप्रिल महिन्यात सर्वात कमी ४२ अपघात झाले. मार्चमध्ये सर्वात जास्त म्हणजे २१ तर फेब्रुवारीत सर्वात कमी म्हणजे ७ जण ठार झाले.औरंगाबाद शहर पोलिसांच्या हद्दीत अपघातांचे प्रमाण वाढते आहे. जालना रोड, नगर रोड, जळगाव रोड, पैठण रोड यांसह विविध रस्त्यांवर वाहतुकीचा प्रचंड लोड आहे. सतत वाहतूक विस्कळीत होते. दुचाकीचालकांना स्वत:चा जीव धोक्यात घालून रस्त्यावरून वाहन चालवावे लागते. यातून सतत अपघात होतात. अनेकदा हेल्मेट सक्ती करूनही पोलीस आयुक्तांच्या या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. यामुळे दुचाकीचालकांना जीव गमवावा लागतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जानेवारी महिन्यात ५० अपघात झाले. यात १४ जणांना जीव गमवावा लागला, तर ४८ लोक जखमी झाले. फेब्रुवारी महिन्यात अपघातांची संख्या ५१ होती. यात ७ जणांचा मृत्यू झाला, तर ६४ लोक जखमी झाले. मार्च महिन्यात ५८ अपघातांत २१ जणांचा जीव गेला आणि ९५ लोक जखमी झाले.