शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची पहाट

By admin | Updated: July 23, 2014 00:32 IST

सितम सोनवणे , लातूर लातूर रेल्वेस्थानकावर मंगळवारी पहाटे ४़४५ पासून प्रवाशांची लगबग सुरु होती़ कोणी गावाला जाण्यासाठी, कोणी पाठविण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले होते़

सितम सोनवणे , लातूरलातूर रेल्वेस्थानकावर मंगळवारी पहाटे ४़४५ पासून प्रवाशांची लगबग सुरु होती़ कोणी गावाला जाण्यासाठी, कोणी नातेवाईकाला घेऊन जाण्यासाठी तर कोणी पाठविण्यासाठी रेल्वेस्थानकावर आले होते़ आॅटोवाले, बसगाड्या व्यावसायिक यांच्यामुळे रेल्वेस्थानकाचा परिसर गजबजून गेला होता़ मंगळवारी पहाटे ४़४५ शहरात रिमझिम पाऊस सुरु होता़ त्यामुळे तुरळक प्रवासी व त्यांच्या नातेवाईकांची ये-जा चालू होती़ शहरातून शिवाजी चौक, रेणापूर नाका, साई चौक येथून प्रवासी आॅटोने रेल्वेस्थानकाकडे येत होते़ मंगळवार असल्याने अमरावती-पुणे या गाडीसाठी प्रवासी रेल्वेस्थानकावर येण्यासाठी पहाटे ४़४५ पासूनच घराच्या बाहेर पडले होते़ रेल्वेस्थानकावर आल्यानंतर ज्यांचे आरक्षण होते, ते थेट प्लॅटफॉर्म क्र. १ वर गेले़ तर ज्यांनी तिकिट काढले नव्हते, ते तिकिट घराकडे जाऊन रांगेत तिकिट काढत होते़ तिकिट घर गर्दीने गजबजले होते़ रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्र. १ वर प्रवासी, त्यांचे नातेवाईक यांची रेलचेल होती़ तर काही प्रवासी अजूनही प्लॅटफॉर्मवर शांत पहुडले होते़ रेल्वेपटरीही येणाऱ्या रेल्वेची वाट पाहत होती़ रात्री मुक्कामाला आलेल्या अहमदपूर, उदगीर व निलंगा डेपोच्या बस रेल्वेस्थानकाच्या बाहेर शांतपणे उभ्या होत्या़ वाहक-चालक बसमध्ये विश्रांती घेत होते़ रिमझिम पावसामुळे रेल्वेस्थानकाच्या वातावरणात गारठा वाढला होता़ रेल्वेस्थानकाचे वातावरण रिमझिम पावसामुळे गारठून गेले होते़ रेल्वे स्थानकाच्या बाहेर चहा स्टॉलला प्रवासी, त्यांचे नातेवाईक गरम चहा पिऊन रेल्वेस्थानकाकडे येत होते़ रेल्वे स्थानकावरील स्पिकरवरून अमरावती गाडी प्लॅटफॉर्म नं़ १ वर येत असल्याची उद्घोषणा होताच पुण्याला जाणारे सर्व प्रवासी प्लॅटफॉर्म नं़ १ वर येऊन थांबले़ काहीजण आपल्या नातेवाईकांना घेऊन जाण्यासाठी प्रतीक्षेत होते़ पुणे-अमरावती ही रेल्वे आठवड्यातून मंगळवार व रविवारी सकाळी ६ वाजता लातूर रेल्वेस्थानकावर येते़ ६़़३० ला पुण्याकडे प्रस्थान करते़ तर हिच रेल्वे पुणे - अमरावतीला जाण्यासाठी पहाटे ४ वाजता शनिवारी व सोमवारी लातूर रेल्वेस्थानकावर येते़ स्थानकावरून हिरवे सिग्नल मिळताच जोरजोरात शिट्या मारत अमरावती-पुणे ही रेल्वे प्लॅटफॉर्म नं़ १ वर आली़ लातूरला उतरणाऱ्या प्रवाशांची, पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची एकच लगबग, जागा पकडण्यासाठीची धावपळ चालू होती़ मुख्य गेटवर तिकिट चेकर तिकिट चेक करण्यासाठी उभे होते़ येणाऱ्या-जाणाऱ्यांचे तिकिट चेक करूनच बाहेर जाऊ दिले जात होते़ मुंबई-लातूर रेल्वे आज ४० मिनिटे उशिरा होणार होती, तरी प्रवाशांची त्यांच्या नातेवाईकांची गर्दी होती़रात्रीची पाळी असल्याने रात्री येणाऱ्या गाड्यांमध्ये ड्रायव्हर बॉक्स टाकण्याचे माझे काम आहे़ रात्रभर तीन गाड्या येऊन गेल्या़ त्यामध्ये तीन बॉक्स टाकले़ या बॉक्समध्ये लाल, हिरवे, झेंडे व ड्रायव्हरचे उपयुक्त साहित्य असते, अशी माहिती बॉक्सबॉय सालत चाऊस यांनी दिली़ लातूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी अपुऱ्या सुविधा आहेत़ चहा स्टॉल नाही़ वृत्तपत्रे नाहीत़ बसण्याची व्यवस्थाही चांगली नाही़ याची प्रशासनाने दखल घेण्याची गरज असल्याचे मत उदगीरचे डॉ़ रामप्रसाद लखोटिया यांनी व्यक्त केले़