औरंगाबाद : सिडको- हडको परिसर डेंग्यूच्या विळख्यात आला असून, उर्वरित शहरालाही डेंग्यूसह साथरोगांचा संसर्ग होत आहे. शहरात डेंग्यूसदृश आजारामुळे ४ जणांचा बळी गेला आहे. साथरोग वाढत असून पालिकेची उपाययोजना यंत्रणा तोकडी पडत असल्याचे चित्र दिसते आहे. नागरिकांमध्येही साथरोगांबाबत जागृती होत नाही. सिडको- हडको भागात २२ वॉर्ड येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रावर साथरोग नियंत्रणाबाबत आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी आढावा घेतला.
दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांबाबत पालिकेला खाजगी रुग्णालय माहिती देत आहेत. मात्र, तरीही मनपाने उपाययोजना करण्यात कुचराई केल्याचे स्पष्ट होत आहे. एन-११ येथील दीपनगर येथे राहणारा योगेश मिरगे हा २८ वर्षीय युवक, स्वराज कुंटे हा ४ वर्षीय मुलगा दगावला. तत्पूर्वी २२ जुलै रोजी बालाजी फंड हा एन-३ येथील १४ वर्षीय मुलगा डेंग्यूसदृश आजाराने दगावला. ३१ जुलै रोजी अश्विनी बोलकर या खेळाडूचा डेंग्यूनेच मृत्यू झाला. हा सगळा साथरोगांचा घटनाक्रम पाहता शहर डेंग्यूच्या विळख्यात आल्याचे दिसते आहे. ९ जुलै रोजी शिवाजीनगर येथील एक महिला डेंग्यूने दगावल्याच्या कारणावरून १० जुलै रोजी मनपा सभागृहात वातावरण तापले. आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री कुलकर्णी यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. त्यानंतर ३ मृत्यू त्याच आजाराने झाले असून, विभागातील पूर्ण कर्मचाऱ्यांना आरोग्य मोहिमेसाठी प्रवृत्त करण्याची गरज निर्माण झाली आहे.
साथरोगांना आळा घाला -फौजिया खान
साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने सज्ज राहावे, असे आदेश आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी आरोग्य संचालक, उपसंचालक, मनपा आयुक्तांना फोनवरून दिले.
डेंग्यू, चिकुन गुनियासदृश साथरोगाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक लस व औषध साठ्याची तरतूद करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
आयुक्तांना निवेदन
काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र दाते यांनी विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. साथरोग पसरलेल्या भागांना ‘एण्डामिक एरिया’ म्हणून घोषित करण्याची मागणी केली. सिडको- हडकोसह, नेहरूनगर, कटकटगेट, पुंडलिकनगर, गारखेडा या भागांत डेंग्यूसदृश आजाराची साथ पसरली असून, मनपाला कार्यवाहीचे आदेश देण्याची मागणी त्यांनी केली आहे, तर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला.
बिल थांबविले
प्रभाग ब अंतर्गत औषधी फवारणी करणाऱ्या संस्थेचे बिल थांबविण्यात आले आहे. मनपातील एका पदाधिकाऱ्याची त्या कंत्राटदारासोबत पार्टनरशिप आहे. कामात कुचराई किंवा औषधात भेसळ करून फवारणी होत असल्याचा प्रशासनाला संशय आहे. त्यामुळे सिडको- हडकोत साथरोगांचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसते आहे.
अबेट वाटणार; फॉगिंग करणार
डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. त्या पाण्यामध्ये अबेट ही औषधी टाकली तर अंडी नष्ट होतात. त्यामुळे जनजागृती मोहिमेत अबेट वाटप करण्यात येईल.
फॉगिंग करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
डेंग्यूचा विळखा!
By admin | Updated: August 1, 2014 01:07 IST
औरंगाबाद : सिडको- हडको परिसर डेंग्यूच्या विळख्यात आला असून, उर्वरित शहरालाही डेंग्यूसह साथरोगांचा संसर्ग होत आहे. शहरात डेंग्यूसदृश आजारामुळे ४ जणांचा बळी गेला आहे.
डेंग्यूचा विळखा!
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}