नफेखोरीच्या नादात प्रवाशांचा जीव धोक्यात
By Admin | Updated: May 12, 2014 00:39 IST2014-05-12T00:23:49+5:302014-05-12T00:39:04+5:30
औरंगाबाद : विमान कंपन्यांच्या नफेखोरीच्या नादामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. ७ मे रोजी रात्री मुंबईहून आलेल्या जेटच्या विमानाने हार्ड लँडिंग केले.

नफेखोरीच्या नादात प्रवाशांचा जीव धोक्यात
औरंगाबाद : विमान कंपन्यांच्या नफेखोरीच्या नादामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे. ७ मे रोजी रात्री मुंबईहून आलेल्या जेटच्या विमानाने हार्ड लँडिंग केले. त्या विमानातील सुमारे ७० प्रवाशांनी १५ सेकंद थरार अनुभवला. पायलटच्या कौशल्यामुळे मोठा अपघात टळला असला तरी त्या घटनेमागील खरे कारण अजूनही दडवून ठेवण्यात आले आहे. मात्र, ते विमान मुंबईहून निघण्यापूर्वी घडलेला प्रकार काही प्रवाशांनी लोकमतला सांगितला. त्या विमानाला मुंबईहून औरंगाबादला निघण्याच्या वेळेतच गडबड झाली होती. ५.४० ही विमान येण्याची वेळ होती. ते विमान ६ वाजून १० मिनिटांनी आले. विमान टेकआॅफला येण्यापूर्वी क्लिनिंग व लगेजला वेळ जातो. ७ मे रोजी ७० प्रवासी विमानाकडे घेऊन जाण्यासाठी विमानतळाची बस आली. विमानाजवळ बस आल्यावर ती १० ते १५ मिनिटे थांबवून ठेवली. विमानातील लगेज संपताच प्रवाशांना आत सोडण्यात आले. विमानाचे क्लिनिंग व टेक्निकल तपासणी न करताच ते औरंगाबादच्या दिशेने झेपावले आणि या विमानतळावरील धावपट्टीवर घसरले. विमानाच्या तांत्रिक तपासणीचा वेळ कमी करून जास्तीत फेर्या मारण्याच्या हव्यासासाठी कंपन्यांकडून असा प्रकार घडत असल्याचे जेटच्या एका प्रवाशाने सांगितले. नियमानुसार तासभर तपासणी नियमानुसार विमान लँड झाल्यावर तासभर त्याची तपासणी केली जावी. त्यानंतर ते पुढील टेकआॅफसाठी तयार करावे. मात्र, अलीकडे विमाने येण्यात, उतरण्यात आणि पुन्हा उड्डाण करण्याच्या वेळेत ताळमेळ राहिलेला नाही. विमानाचे जास्तीत जास्त ‘युटीलायझेशन’ करण्याच्या नादात कंपन्या विमानाच्या तांत्रिक घटकांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. २८ मार्चला विमान बदलले दिल्ली विमानतळावरून एअर इंडियाचे एक विमान ३ वाजून १० मिनिटांनी औरंगाबादकडे निघाले. त्या विमानात येथील उद्योगपती व खासदार होते. विमानाने टेकआॅफ करताच काही वेळाने पायलटच्या लक्षात आले की, योग्य उंचीवर ते उडत नाही. त्यामुळे ते विमान पुन्हा विमानतळावर उतरविण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. दोन तासांनी नवीन विमानाने प्रवाशांना औरंगाबादकडे आणण्यात आले. ५ एप्रिल रोजी पुन्हा तेच विमान दिल्लीहून औरंगाबादच्या दिशेने झेपावले. त्या विमानाला पुन्हा तीच अडचण आली. ते विमान औरंगाबादला लँड होताना धावपट्टीची लाईट गेली. २८ मार्चच्या प्रकाराबद्दल उद्योगपती उल्हास गवळी यांनी एअर इंडिया अॅथॉरिटीकडे तक्रारही नोंदविली आहे.