संत एकनाथ विद्यालयात वृक्षदिंडी काढण्यात आली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 23:08 IST2019-07-12T23:08:39+5:302019-07-12T23:08:54+5:30

येथील संत एकनाथ विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त शुक्रवारी दिंडी काढण्यात आली. तसेच याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले.

Dandi was in Saint Eknath Vidyalaya | संत एकनाथ विद्यालयात वृक्षदिंडी काढण्यात आली

संत एकनाथ विद्यालयात वृक्षदिंडी काढण्यात आली

चितेगाव : येथील संत एकनाथ विद्यालयात आषाढी एकादशी निमित्त शुक्रवारी दिंडी काढण्यात आली. तसेच याप्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले.


आषाढी एकादशीनिमित्त सकाळी नऊ वाजता पैठण तालुका शिक्षण संस्थेचे सचिव गणेशराव पाटील वाघचौरे , कोषाध्यक्ष सजनराव पाटील घुंगार्डे, मनिषा वाघचौरे, मुख्याध्यापक ज्ञानदेव शिंदे, मुख्याध्यापक शिवाजी भादे यांच्या हस्ते दिंडीचे आद्य वारकरी विणेकरी गंगाधर बाबा यांचे पूजन करण्यात आले.

विद्यालयातून दिंडीला सुरुवात झाली. गावातील श्रीराम व हनुमान भजनी मंडळ आणि विद्यालयातील विद्यार्थी यांनी संपूर्ण गावातून विठ्ठलनामाच्या जयघोष करत फेरी मारली तसेच दिंडीत बहुतांश विद्यार्थ्यांनी विठ्ठलांची वेशभूषा बनवलेली होती.

तसेच विद्यार्थ्यांनीनी डोक्यावरती तुळस घेऊन विठ्ठल नामाचा जयघोष केला. शाळेत संपूर्ण विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आले. त्यानंतर शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Dandi was in Saint Eknath Vidyalaya