दामिनी पथकाने सैराट जोडपे पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:04 IST2021-07-18T04:04:17+5:302021-07-18T04:04:17+5:30

वाळुज एमआयडीसी परिसरातून अक्षय साहेबराव पवार (२२, रा. वैजापूर, ता. गंगापूर) याने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून ...

The Damini squad caught the Sairat couple | दामिनी पथकाने सैराट जोडपे पकडले

दामिनी पथकाने सैराट जोडपे पकडले

वाळुज एमआयडीसी परिसरातून अक्षय साहेबराव पवार (२२, रा. वैजापूर, ता. गंगापूर) याने एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले होते. या प्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. सदरील मुलगा व मुलगी सापडत नसल्यामुळे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक स्नेहा करेवाड यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. आरोपी व अल्पवयीन मुलगी माळी घोगरगाव शिवारात राहत असल्याची माहिती दामिनी पथकाला मिळाली. यावरून दामिनी पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आल्याचे कळताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून आरोपीस अटक केली. तसेच अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. आरोपीला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्नेहा करेवाड, पोलीस कर्मचारी हिरा चिंचोलकर, मोहिनी चिंचोळकर, ईश्वरसिंग कहाटे, गणेश पंडूरे, सांबळे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: The Damini squad caught the Sairat couple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.