निवडणुकीच्या तोंडावर दिवसाआड पाणी

By Admin | Updated: December 4, 2014 00:56 IST2014-12-04T00:21:22+5:302014-12-04T00:56:01+5:30

औरंगाबाद: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने दोनऐवजी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

Daily water in the face of elections | निवडणुकीच्या तोंडावर दिवसाआड पाणी

निवडणुकीच्या तोंडावर दिवसाआड पाणी

औरंगाबाद: महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने दोनऐवजी एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.
दुष्काळाचे सावट असताना फक्त निवडणुकीच्या तोंडावरच कंपनीला हा राजकीय निर्णय घेण्यास भाग पाडले जात आहे काय, असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा करणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
आॅक्टोबर २०१२ पासून शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा होतो आहे. आजवर २६ महिन्यांत ८ महिने २० दिवस पाणीपुरवठा झाला असून, नागरिकांकडून ६ हजार रुपये पाणीपट्टी या काळात मनपाने घेतली आहे. मुख्य जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा अजून विषय नाही, वार्डातील जलवाहिन्या टाकण्याचे काम अजून तसेच आहे. त्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही.

Web Title: Daily water in the face of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.