सायबर भामटे मराठी बोलू लागले, वीज ग्राहकांनो कनेक्शन तोडण्याचे खोटे ‘कॉल’ ओळखा

By साहेबराव हिवराळे | Published: April 11, 2024 07:03 PM2024-04-11T19:03:23+5:302024-04-11T19:03:37+5:30

ॲप्लिकेशन डाउनलोड करून खाते साफ : सायबर भामट्यांची शक्कल

Cyber bhamte started speaking Marathi, electricity consumers identify fake 'calls' to cut connection | सायबर भामटे मराठी बोलू लागले, वीज ग्राहकांनो कनेक्शन तोडण्याचे खोटे ‘कॉल’ ओळखा

सायबर भामटे मराठी बोलू लागले, वीज ग्राहकांनो कनेक्शन तोडण्याचे खोटे ‘कॉल’ ओळखा

छत्रपती संभाजीनगर : महावितरणमधून बोलत आहे. तुमचे मागील महिन्याचे वीज बिल भरले नाही तर लाइट कट होईल. असे सांगून वीजबिल भरण्याचे सांगून एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करायला लावून मोबाइलचा ताबा मिळवून भामटे बँक खाते साफ करत आहेत. तेव्हा ग्राहकांनी सावधानता बाळगावी, असे महावितरणने आवाहन केले आहे.

महावितरण वीजबिल भरण्यासह इतर सेवा ऑनलाइन केल्या आहेत. मात्र कोणत्याही वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून अशा प्रकारचे एसएमएस किंवा व्हाॅट्सॲप मेसेज पाठवण्यात येत नाहीत. महावितरणकडून केवळ मोबाइल क्रमांकांची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांनाच सिस्टिमद्वारेच पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी तसेच अन्य तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा बंद झाल्यास मेसेज पाठविण्यात येतात. महावितरणचे एकच अधिकृत संकेतस्थळ आहे. यामध्ये ग्राहक सेवेसाठी कन्झुमर ॲपवरून सेवा दिल्या जातात.

भामटे मराठी बोलू लागले...
पूर्वी सायबर चोरटे हिंदीतून बोलत असत. आता ते मराठी भाषेचा वापर करत असल्याने नागरिकांचा त्यांच्यावर सहज विश्वास बसत आहे. तसेच वीजबिल भरण्यासाठी वैयक्तिक मोबाइल क्रमांकावरून ऑनलाइन पेमेंटसाठी बनावट लिंक पाठवून ग्राहकांना सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगितले जात आहे. त्यास प्रतिसाद दिल्यास मोबाइल किंवा संगणक हॅक करून खात्यातील रक्कम हडपली जात आहे. आपली फसवणूक झाल्यास तत्काळ जवळच्या पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. ग्राहकांनी कोणतेही सॉफ्टवेअर अथवा लिंक डाऊनलोड करू नये. अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉल्सला प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

माहिती देऊ नका...
महावितरणकडून वीज ग्राहकांना असे कॉल्स येत नाहीत. असे ॲप्लिकेशन डाउनलोड करायला लावले जात नाही. ग्राहकांनी अनोळखी नंबरवर आपली माहिती देऊ नये. शंका आल्यास महावितरणच्या टोल फ्री नंबरवर कॉल करा.
- राहुल गुप्ता, सहव्यवस्थापकीय संचालक, महावितरण

Web Title: Cyber bhamte started speaking Marathi, electricity consumers identify fake 'calls' to cut connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.