शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदानाचा उत्साह कायम
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
5
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
6
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
7
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
8
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
9
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
10
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
11
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
12
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
13
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
14
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
15
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
16
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
17
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
18
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
19
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
20
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...

हायवेसाठी १८ हजार मोठ्या झाडांची ‘कटिंग’, त्या बदल्यात खुरट्या झाडांची ‘सेटिंग’

By साहेबराव हिवराळे | Published: August 18, 2022 12:27 PM

३० किलोमीटरमधील १८ हजार झाडे कापली : तुलनेत तीन ते पाच पट लावण्याची गरज होती

- साहेबराव हिवराळेऔरंगाबाद : सोलापूर-धुळे महामार्गाच्या कामासाठी औरंगाबाद शहरालगत ३० किलोमीटर अंतरावर १८ हजार झाडांची कत्तल करण्यात आली. अगदी तीस ते चाळीस वर्षांपूर्वीचे वटवृक्ष आणि इतर झाडांची त्यात ‘खांडोळी’ झालेली आहे. समृद्धी महामार्गातही ३ हजार झाडांची कत्तल झाली; परंतु त्या तुलनेत अजून झाडे लावण्यात आलेली नाहीत. सोलापूर हायवेला खुरटी झाडे लावून शंभर टक्के रोपण केल्याचे सांगितले जाते. दुभाजक आणि रस्त्याच्या कडेला वापरण्यात येणाऱ्या झाडांची संख्या तोडलेल्या झाडांपेक्षा पाच पटीत लावली तरी कमीच पडणार आहे.

औरंगाबाद शहराजवळून आणि मराठवाड्यातून जाणाऱ्या महामार्गामुळे जिल्ह्यात ३२ हजार झाडांची कत्तल झाली. तसेच ४ डोंगर आणि १२ टेकड्या भुईसपाट करण्यात आल्या. रस्त्यांच्या कामांमुळे निसर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे, वृक्षतोडीमुळे वाळवंटीकरण सुरू आहे, त्यामुळे पर्जन्यमान कमी होणार आहे. जैवविविधता मोठ्या प्रमाणावर नष्ट झालेली आहे. महामार्ग करताना जनतेची सोय म्हणून उदो उदो केला जात आहे; पण दुसरी बाजू म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास मात्र लपवला जात आहे.

महामार्ग बांधणी करताना अनेकदा सूचना देऊनही प्राण्यांसाठी खालून आवागमनाचे मार्ग म्हणजेच अंडरपास बहुतांश ठिकाणी बनवले नाहीत किंवा त्या भागात उंच कुंपण केलेले नाही. रोज या भागात अपघातात वन्य जिवांचा मृत्यू ओढवत आहे. समृद्धी रस्त्यावरही परिस्थिती वेगळी नाही. महामार्गाच्या एकूण खर्चाच्या एक टक्का रक्कम ही झालेल्या निसर्गहानीच्या भरपाईसाठी राखीव असताना आणि आधी वृक्षारोपण करावे, अशी तरतूद असताना वापरण्यात आलेली नाही.

वृक्षप्रेमींमध्ये नाराजीकेंद्र व राज्य शासनाला निवेदन पाठवून ‘आपण झाडे तोडली, पण लावणार कोण?’ हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पंतप्रधान कार्यालयाने तसेच तत्कालीन राज्य शासनाने राज्यातील औरंगाबाद, मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, कोकण या सर्व मुख्य अभियंत्यांना पत्रे पाठविली आहेत. मात्र, यावर अतिशय संथगतीने काम सुरू आहे.- राहुल देव मनवर

महामार्गाच्या दुतर्फा स्वदेशी झाड लावा...एप्रिल महिन्यात केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन तोडलेल्या झाडांच्या बदल्यात झाडे लावली नसल्याचे सांगितले. तसेच महामार्गाच्या दुतर्फा स्वदेशी स्थानिक वृक्ष लावण्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी केली होती.- डॉ. किशोर पाठक, मानद वन्यजीव रक्षक

अमृत महोत्सवातही लावली झाडे...सर्व अधिकार वन विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे आहेत. वृक्षारोपणाचे काम १०० टक्क्यांपर्यंत झालेले आहे. अमृतमहोत्सवात तीसगाव परिसरात वन विभाग आणि कंपनीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले आहे.- केतन वाकणकर, एलएनटी नियोजन अधिकारी

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गenvironmentपर्यावरण