शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
3
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
4
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
5
“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
6
IND vs NZ : आधी हळू चेंडू टाकला मग वेग पकडला! दोन्ही सलामीवीरांचा हर्षित राणानं केला ‘करेक्ट कार्यक्रम'
7
सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा
8
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
9
‘ठाकरे अजूनही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतात…’, संजय राऊतांचं मोठं विधान
10
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
12
'X'वर अश्लील कंटेंट विरोधात अ‍ॅक्शन, ६०० अकाउंट डिलीट; मोदी सरकारच्या इशाऱ्यानंतर, इलॉन मस्क यांची कारवाई
13
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
14
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
15
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
16
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
17
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
18
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
19
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशच्या मजुरांची क्रूरता; मंदिरातील चोरीस विरोध केल्याने महिला कीर्तनकाराची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 15:31 IST

कीर्तनकार हत्याकांड उलगडले; मंदिरात कीर्तनकाराचा दगडाने ठेचून खून, आरोपींची कबुली हत्येचा उद्देश फक्त चोरी

छत्रपती संभाजीनगर: कीर्तनकार सुनीता अण्णासाहेब पवार महाराज यांच्या निर्घृण हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या हत्येप्रकरणी मूळच्या मध्यप्रदेशातील दोन मजुरांना छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. संतोष उर्फ भायला चौहान आणि अनिल उर्फ हाबडा विलाला अशी आरोपींची नावे आहेत. चोरी करताना विरोध केल्याने कीर्तनकार पवार यांची हत्या केल्याची कबुली त्यांनी दिली.

२७ जून रोजी रात्री चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून दानपेटी, मूर्त्या व इतर साहित्य चोरी केल्यानंतर झोपलेल्या कीर्तनकार सुनीता पवार यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला होता. याप्रकरणी त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून विरगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला १ जुलै रोजी गोपनीय माहिती मिळाली. महालगाव शिवारातील गणेश भेळ सेंटर परिसरात एक संशयित व्यक्ती फिरत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव संतोष उर्फ भायला चौहान (रा. अंछली, ता. सेंधवा, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) असे असल्याचे निष्पन्न झाले. त्याने साथीदार अनिल उर्फ हाबडा विलाला याच्यासोबत मिळून मंदिरात चोरीसाठी आले असताना कीर्तनकार सुनीता पवार यांचा खून केल्याची कबुली दिली. अनिल हा घटनेनंतर गावी पळून गेला होता. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी मध्यप्रदेशमध्ये पाठवलेल्या पथकाने शिरपूर सीमेवरून त्याला अटक केली. चौकशीत त्यानेही गुन्ह्याची कबुली दिली. 

ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड, अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, पोनि विजयसिंह राजपूत, सपोनि शंकर वाघमोडे व स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस ठाणे विरगाव यांनी केली.

मजुरांच्या नजरेस पडले मंदिर अन् खूनमध्यप्रदेश येथून मजुरीसाठी आलेले संतोष चौहान आणि अनिल विलाला हे मंदिर परिसरात मागील वर्षभरापासून राहत होते. दोघांच्या नजरेत मंदिर आले. येथे भरपूर पैसे आणि दागिने मिळतील या उद्देशाने दोघांनी मंदिरात प्रवेश केला. कीर्तनकार सुनीता पवार यांना चोरांची चाहूल लागली. त्यांनी विरोध केल्याने त्यांचा दोघांनी खून केल्याचे स्पष्ट केले. दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम १०३, ३०५, ३३१ (८), ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल असून, त्यांना पुढील तपासासाठी विरगाव पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMarathwadaमराठवाडा