शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकांसमोर अडचणींचा डोंगर

By admin | Updated: July 23, 2014 00:33 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’ क्षेत्रातील उद्योजकांना आवश्यक त्या मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याकडे औद्योगिक विकास महामंडळाने साफ दुर्लक्ष केले आहे़

उस्मानाबाद : जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’ क्षेत्रातील उद्योजकांना आवश्यक त्या मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याकडे औद्योगिक विकास महामंडळाने साफ दुर्लक्ष केले आहे़ कार्यालयीन कामकाजाच्या अडथळ्यांची शर्यत पार करून उद्योजक व्यवसाय चालवित आहेत़ उस्मानाबादेतील एमआयडीसीतील काही सुविधा वगळता इतरत्र परिस्थिती भीषण आहे़ मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळेच जिल्ह्यातील अनेक उद्योजकांनी भूखंड विकसित न करणेच पसंत केले आहे़‘एमआयडीसी’ क्षेत्रामुळे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबादसह भूम, कळंब, उमरगा आदी भागातील बाजारपेठेतील आर्थिक उलाढालही मोठ्या प्रमाणात वाढेल, ही अपेक्षा फोल ठरली आहे़ त्यामुळे नवीन उद्योजकांना एखादा उद्योग सुरू करण्यास इथे वाव राहिलेला नाही़ औद्योगिक विकास महामंडळाने केवळ जिल्ह्यातील तब्बल १४१९.२२५ एकरवरील भूखंड वाटप करण्यावर भर दिला़ भूखंड वाटप केल्यानंतर तेथील आवश्यक त्या मूलभूत सुविधा पुरविण्याकडे मात्र, कानाडोळा करण्यात आला आहे़ अनेकांनी उद्योग सुरू करण्याचे पाहिलेले स्वप्न मूलभूत सुविधांअभावी धुळीस मिळत आहे़ लाखो रूपये खर्च करून उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांनाही सद्यस्थितीत मुख्यत: पाणी, वीज व रस्ते या मुख्य समस्यांचा सामना करावा लागत आहे़ अनेकांनी महामंडळावर अवलंबून न राहता आपल्या उद्योगाला उभारणी देण्याचा प्रयत्न केला आहे़दोन कूपनलिकांवर उस्मानाबाद, उमरग्याची एमआयडीसीउस्मानाबाद येथील एमआयडीसीतील उद्योजकांना केवळ दोन कूपनलिकांवर पाणी पुरविण्यात येत आहे़ पाणी कमी पडल्यानंतर अनेकजण पाणी विकत घेऊन गरज भागवित आहेत़ उस्मानाबाद शहरासाठीची उजनी उद्भव योजना पूर्णत्वास आली आहे़ त्यामुळे एमआयडीसी नजीकच्याच जलकुंभापासून पाईपलाईन करून पाणी उपलब्ध करून घेण्याचे काम सुरू असल्याचे अधिकारी सांगत आहेत़ मात्र, हे काम कधी पूर्ण होणार, याची खात्री मात्र, कोणालाच नाही !अनेक प्लॉटवर कर्जअनेकांनी उद्योग सुरू करण्यासाठी घेतलेल्या भूखंडावर एमएसएफसी, डीआयसी, एमएसएसआयडीसी आदी विविध बँकांची कर्जप्रकरणे करून अनेक मंडळी बाजूला झाली आहेत़ बँकांनी कर्जवसुलीसाठी ते भूखंड इतरांनाही न देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत़ त्यामुळे जोपर्यंत कर्ज फिटत नाही, तोपर्यंत ते भूखंड पडूनच राहणार आहेत़ त्यामुळे या भूखंडाचा ना उद्योजकांना लाभ मिळतो ना महामंडळाला तेथून महसूल मिळतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ स्पर्धेत उद्योजक अयशस्वीउस्मानाबादसह इतर ठिकाणच्या एमआयडीसी क्षेत्रात अनेकांनी उद्योग सुरू केले़ मात्र, कार्यालयीन कामकाज, नियमांचे अडथळे आणि बाजारपेठेचा अभाव यामुळे अनेक उद्योजक उद्योगाला भरभराट देण्यात अयशस्वी ठरले आहेत़ कच्चा माल बाहेरून आणणे आणि उत्पादीत मालही बाहेरील बाजारपेठेत विक्री करण्याची वेळ जिल्ह्यातील उद्योजकांवर आहे़ काही प्रमाणात जिल्ह्यातील बाजारपेठेत माल विक्री केला जात असला तरी बाहेरील मोठ्या बाजारपेठेशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही़उद्योजक म्हणतात़़उद्योजकांना कच्चा माल बाहेरून आणावा लागतो. शिवाय उत्पादित मालाला जिल्ह्यात चांगली बाजारपेठ नाही़ त्यामुळे इतर जिल्ह्यातील मोठ्या बाजारपेठेत मार्केटींग करून विक्री करावी लागते़ त्यामुळे शासनाने एमआयडीसीतील उद्योजकांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगली बाजारपेठ उभा करून देण्याची गरज आहे़ एखादा मोठा कारखाना, उद्योग इथे उभा राहिला, तर इतर लघु उद्योगांनाही भरभराट येईल़ शिवाय मूलभूत सुविधा वेळेवर पुरविल्या तर उद्योजकांना त्याचा मोठा लाभ होईल, असे उस्मानाबाद येथील उद्योजक संतोष शेटे यांनी सांगितले़भूम एमआयडीसीत माझे चार उद्योग सुरू आहेत़ हे चार उद्योग चालवून परिसरातील युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे़ मात्र, महामंडळाकडे वारंवार मूलभूत सुविधा पुरविण्याबाबत मागणी केल्यानंतरही दुर्लक्ष होत आहे़ येथे रस्ता, पाणी, वीज या मूलभूत सुविधांचा अभाव मोठा आहे़ त्यामुळे अनेकांनी भूखंड घेतले असले तरी तेथे उद्योग सुरू केलेले नाहीत़ मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या तर येथील उद्योगास भरभराट येईल, असे भूम येथील विनोद जोगदंड म्हणाले़एमआयडीसीतील उद्योग चालविणे म्हणजे अडथळ्यांची शर्यत पार करणे, असे गणित झाले आहे़ लहान-लहान बाबींसाठी अनेक अडचणींचा उद्योजकांना सामना करावा लागतो़ विजेचा लपंडाव हा कायम सुरू असून, पाण्याचाही प्रश्न भेडसावतो़ अनेक उद्योजकांना उद्योगाचे काम सोडून इतर कार्यालयीन कामासाठीच धावा-धाव करावी लागत असल्याची खंत उस्मानाबाद येथील उद्योजक संजय देशमाने यांनी व्यक्त केली़लघु उद्योजक उद्योगाला चालविण्यासाठी मोठे प्रयत्न करतात़ मात्र, उत्पादित मालासाठी उस्मानाबाद येथे मोठी बाजारपेठ नाही़ त्यामुळे शासनाने एमआयडीसी क्षेत्रात उत्पादित होणारा माल विकत घेण्याची गरज आहे़ किंवा विविध शासकीय कार्यालयांना लागणारे साहित्य एमआयडीसीतून खरेदी करण्याकडे भर द्यावा, जिल्ह्यातच उत्पादीत मालाला चांगली बाजारपेठ मिळाली तर अनेक उद्योग चांगल्या पध्दतीने चालतील, असे महाराष्ट्र लघू उद्योग विकास संघटनेचे अध्यक्ष युवराज नळे यांनी सांगितले़कळंब एमआयडीसीतील कच्चे रस्ते, विजेचा अभाव आणि पाण्याची समस्या हे प्रश्न गंभीर आहेत़ ३३ केव्ही ट्रान्सफॉर्मरचा प्रस्ताव लाल फितीत अडकला आहे़ पथदिवे नसल्याने रात्रीच्यावेळी मोठ्या समस्या येथे येणाऱ्या कामगारांना सहन कराव्या लागत आहेत़ तर बँकांकडून उद्योजकांना कर्जरूपी अपेक्षित सहकार्य मिळत नाही़ जोपर्यंत मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार नाही, जोपर्यंत जिल्ह्यातील एमआयडीसी विशेषत: लघु उद्योजकांचा उद्योग सुरळीत चालणार नसल्याचे कळंब तालुका लघु उद्योग भारतीचे अध्यक्ष सोमनाथ साबळे यांनी सांगितले़उमरगा येथील एमआयडीसीतील अंतर्गत रस्ते कच्चे असल्याने अनेक समस्या उद्भवत आहेत़ केवळ दोन कूपनलिका असून, त्याद्वारे अपेक्षित पाणी मिळत नाही़ उद्योगासाठी व झाडे जगविण्यासाठी उन्हाळ्यात पाणी विकत घेऊन वापरले आहे़ मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्याशिवाय उद्योजकांच्या व्यवसायाला चालना मिळणार नाही, असे उमरगा येथील उद्योजक नितीन होळे यांनी सांगितले़