परंडा उपसभापतींसह चौघांवर गुन्हा
By Admin | Updated: July 23, 2016 00:53 IST2016-07-23T00:44:21+5:302016-07-23T00:53:19+5:30
परंडा : ‘माझ्या कार्यकर्त्यांना त्रास का देतोस’ म्हणून मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणाला अशी फिर्याद ग्रामसेवकाने दिल्यावरून परंडा पंचायत समितीचे

परंडा उपसभापतींसह चौघांवर गुन्हा
परंडा : ‘माझ्या कार्यकर्त्यांना त्रास का देतोस’ म्हणून मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणाला अशी फिर्याद ग्रामसेवकाने दिल्यावरून परंडा पंचायत समितीचे उपसभापती मेघराज पाटील व अन्य तिघांविरूद्ध शुक्रवारी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आलेश्वर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रशांत पाटील हे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीला जात होते. याचवेळी उपसभापती मेघराज पाटील यांची भेट झाली. यावेळी त्यांनी ‘तु माझ्या कार्यकर्त्यास का त्रास देतोस’, असा जाब विचारीत अरेरावीची भाषा वापरून दमबाजी केली. तसेच ‘तुझ्या विरोधात आलेश्वर येथील ग्रामस्थांनी तक्रार दिली आहे’, असे म्हटल्यानंतर ग्रामसेवक पाटील यांनीही ‘तक्रारीची चौकशी होईल’ असे उत्तर देताच उपसभापती मेघराज पाटील, अमोल गोडगे, सुरेश पाटील, विजयकुमार काळे (रा.आलेश्वर) यांनी ग्रामसेवक प्रशांत पाटील यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या कागदपत्राची बॅग हिसकावून घेऊन फेकून अशी फिर्याद ग्रामसेवक पाटील यांनी परंडा पोलीस ठाण्यात दिली.
त्यावरून उपसभापती मेघराज पाटील यांच्यासह अन्य तिघांवर परंडा पोलिसांत भादंवी कलम ३५३, ३३२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जी. डी. सूर्यवंशी हे करीत आहे. (वार्ताहर)