अवैध देशी दारू विक्री करणार्‍या पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

By Admin | Updated: May 30, 2014 00:22 IST2014-05-30T00:09:36+5:302014-05-30T00:22:17+5:30

परभणी: जिल्ह्यात अवैध दारु विक्री जोरात सुरु आहे. या दारुविक्रीविरुद्ध पोलिस प्रशासनाने मोहीम उघडली असून २८ मे रोजी जिल्हाभरात १५ आरोपींकडून १७ हजार रुपयांची दारु पोलिसांनी जप्त केली.

Criminal cases against fifteen persons who sell illegal country liquor | अवैध देशी दारू विक्री करणार्‍या पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अवैध देशी दारू विक्री करणार्‍या पंधरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल

परभणी: जिल्ह्यात अवैध दारु विक्री जोरात सुरु आहे. या दारुविक्रीविरुद्ध पोलिस प्रशासनाने मोहीम उघडली असून २८ मे रोजी जिल्हाभरात १५ आरोपींकडून १७ हजार रुपयांची दारु पोलिसांनी जप्त केली. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात अवैध दारु विक्रीविरुद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. २८ मे रोजी पाथरी, जिंतूर, पालम, मानवत, नानलपेठ, कोतवाली, गंगाखेड, दैठणा, बोरी या पोलिस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी मारलेल्या छाप्यामध्ये किशनराव भाऊराव तायडे (रा.वडी ता. पाथरी), मधुकर पिराजी घनसावंत (रा. पुंगळा, ता. जिंतूर), अनंतराव रामजी दिवटे (रा. भोगाव, ता. पालम), शिवाजी मरिबा वाघमारे (रा. मोजमाबाद, ता. पालम), मिलिंद बाबुराव गुंडगे (रा. दुधगाव), दादाराव अंबादास पवार (रा.भारस्वाडा ता. परभणी), उत्तम व्यंकोबा व्यवहारे (रा. रंगार गल्ली, गंगाखेड), शेख नूर शेख मंजूर (रा. तारु मोहल्ला, गंगाखेड), अशोक तुकाराम चव्हाण (रा. झोपडपट्टी, परभणी), गणेश जानकीराम सानप (साटला ता. परभणी), गुलाब देवीदास जाधव (रा. धाररोड परभणी), प्रकाश नारायण गायकवाड (वझूर खु. ता. मानवत), ताने शाह हनीफ शाह (रा. कोल्हा ता. मानवत), सोपान दगडू मुसळे (रा. बोरकिनी, ता. जिंतूर), राजू प्रल्हाद मोरे (रा. थोरावा देवी) या आरोपींच्या ताब्यात पोलिसांना दारु आढळली. चोरटी विक्रीच्या उद्देशाने आरोपींनी ही दारु त्यांच्या ताब्यात बाळगली. पोलिसांनी देशी दारुच्या ३८२ बाटल्या जप्त केल्या आहेत. या दारुची किंमत १७ हजार ४९० रुपये एवढी आहे. या प्रकरणात त्या त्या पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे नोंद झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Criminal cases against fifteen persons who sell illegal country liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.