छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे शाखेचा मोठा 'धडाका'! बुढीलेन परिसरातून १० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 19:19 IST2026-03-31T19:18:16+5:302026-03-31T19:19:36+5:30

गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, काही तरुण बुढीलेन परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेहरू भवनसमोरील पाशा हॉटेलच्या बाजूच्या गल्लीत सापळा रचला.

Crime Branch's big 'blast' in Chhatrapati Sambhajinagar MD drugs worth Rs 10 lakh seized from Budhilane area | छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे शाखेचा मोठा 'धडाका'! बुढीलेन परिसरातून १० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे शाखेचा मोठा 'धडाका'! बुढीलेन परिसरातून १० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त

शहरातील बुढीलेन परिसरात एमडी ड्रग्जची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून १० लाख ७९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली होती की, काही तरुण बुढीलेन परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी नेहरू भवनसमोरील पाशा हॉटेलच्या बाजूच्या गल्लीत सापळा रचला. यावेळी संशयास्पदरित्या वावरणाऱ्या सलमान मेहमूद शेख आणि त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सहकाऱ्यांनी सोडले, देशातही विरोध वाढला; इराण युद्धात एकटं पडलेल्या ट्रम्प यांना ४ चुका भोवल्या

सापडले ड्रग्ज

पोलिसांनी आरोपींची झडती घेतली असता, सोहेल मेहमूद शेख याच्याकडे ४९.३१ ग्रॅम एमडी पावडर मिळून आली. याशिवाय इतर आरोपींकडून रोख रक्कम आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. आरोपी ड्रग्ज खरेदी-विक्रीचा व्यवहार करत असतानाच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

एमडी ड्रग्ज: ४९.३१ ग्रॅम पावडर

रोख रक्कम आणि मोबाईल फोन

एकूण किंमत: १०,७९,३००/- रुपये

या प्रकरणाची अधिक चौकशी पोलीस करत असून, या ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे आणखी कुठे पसरले आहेत, याचा तपास गुन्हे शाखा करत आहे.

Web Title : अपराध शाखा ने ड्रग रैकेट का भंडाफोड़ किया, ₹10 लाख का MD जब्त।

Web Summary : छत्रपति संभाजीनगर अपराध शाखा ने बुढ़ीलें में एक ड्रग रैकेट का भंडाफोड़ किया, जिसमें ₹10.79 लाख के MD ड्रग्स के साथ चार लोगों को गिरफ्तार किया गया। पुलिस ने 49.31 ग्राम MD पाउडर, नकदी और मोबाइल फोन जब्त किए। ड्रग रैकेट की सीमा का पता लगाने के लिए आगे की जांच जारी है।

Web Title : Crime Branch busts drug racket, seizes MD worth ₹10 Lakhs.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar Crime Branch dismantled a drug ring in Budhilen, arresting four with MD drugs worth ₹10.79 Lakhs. Police seized 49.31 grams of MD powder, cash, and mobile phones. Further investigation is underway to uncover the extent of the drug racket.