अवैध दारू विकणाऱ्या दोघांवर गुन्हा
By | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:22+5:302020-12-02T04:11:22+5:30
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बाजार परिसरात पोलिसांनी कारवाई केली. यावेळी दारूच्या दुकानाजवळ रमेश साळुबा फलके (३०) व प्रवीण प्रकाश ...

अवैध दारू विकणाऱ्या दोघांवर गुन्हा
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बाजार परिसरात पोलिसांनी कारवाई केली. यावेळी दारूच्या दुकानाजवळ रमेश साळुबा फलके (३०) व प्रवीण प्रकाश केवट (३०) हे दोन युवक देशी दारूची विक्री करीत असल्याचे आढळून आले. पदवीधरच्या निवडणुकीनिमित्त असलेल्या ड्राय डे निमित्त दारू दुकान बंद होते. याचा फायदा आरोपी घेत होते. त्यांच्याकडील देशी दारूच्या १४ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.