शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

बिडकीन ग्रा.पं.च्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

By admin | Updated: December 6, 2014 00:18 IST

बिडकीन : भूखंडाच्या नोंदणीत वारंवार फेरबदल केल्याच्या आरोपाखाली बिडकीन ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांच्याविरुद्ध बिडकीन पोलीस स्टेशनमध्ये ४२० चा गुन्हा दाखल करण्यात आला.

बिडकीन : भूखंडाच्या नोंदणीत वारंवार फेरबदल केल्याच्या आरोपाखाली बिडकीन ग्रामपंचायतचे पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांच्याविरुद्ध बिडकीन पोलीस स्टेशनमध्ये ४२० चा गुन्हा दाखल करण्यात आला.गुरुवारी रात्री अ‍ॅड. राजेंद्र किसनराव धरपळे, रा. फारोळा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १९९७ साली भारतनगरमधील प्लॉट क्र. १८ ते २२ हे अ‍ॅड. राजेंद्र धरपळे यांनी नसिबाबी खालेद यांच्याकडून विकत घेतले. त्याचे खरेदीखतही त्यांच्याकडे असून, तेच प्लॉट त्या मालकांनी शेख अयुबमियाँ व रेहनानी शेख, शेख शरीफ शे. बशीर यांना नोटरीद्वारे विक्री केले व त्यांच्या नावाने तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी नोंद लावली; परंतु सर्व पदाधिकारी यांच्या लक्षात आले की, १६ वर्षांपूर्वीच्या खरेदीखताद्वारे नोंद होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी ६-५-१३ रोजी अ‍ॅड. धरपळे यांच्या नावाचा ठराव रद्द करून तो पूर्ववत ठेवला. त्यानंतर अ‍ॅड. धरपळे यांनी माहितीच्या अधिकारान्वये माहिती घेतली असता सदर नोंदीमध्ये वारंवार फेरबदल होत असल्यामुळे त्यांनी ग्रामपंचायतीचे १६ सदस्य व ग्रामविकास अधिकारी सारंगधर लोढे, ग्रामपंचायत सदस्य वामन साठे, भारती शिंदे, अशोक धर्मे, विकास गोर्डे, सुनीता धर्मे, द्वारकाबाई धर्मे, अलका कोथिंबिरे, पुष्पा चाबूकस्वार, शेख रजिया, अमिनाबी पठाण, गभाबाई चव्हाण, मिर्झा मुनवर, लतीफ कुरेशी, सय्यद फेरोज, माणिक राठोड, सय्यद नशीबाबी सत्तार यांच्यासह नसिमाबी खालेद, शेख अय्यूब, रेहनाबी शेख, शेख शरीफ, शे. अजीम अशा २२ जणांवर कलम ४६३, ४६४, ४६६, ४६८, ४६९, ४७०, ४७७, ४२० (३४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपविभागीय अधिकारी अलसटवार यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रमोद भातनाते तपास करीत आहेत. आम्ही दस्तऐवजात कुठलाही फेरफार केला नसल्याचे ग्रामपंचायत सदस्य अशोक धर्मे यांनी सांगितले.