हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरुन चुलतभावाचा भोसकून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:08 IST2019-05-11T14:05:40+5:302019-05-11T14:08:47+5:30
दोघांच्या भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरून वाद

हळदीच्या कार्यक्रमात नाचण्यावरुन चुलतभावाचा भोसकून खून
औरंगाबाद : भाचीच्या हळदीच्या कार्यक्रमात सख्या चुलत भावाचा नाचण्याच्या किरकोळ वादातून चाकूने भोसकुन खून करण्यात आला . ही घटना शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास चिकलठाण्यातील ऋषीकेश नगर येथे घडली.
आकाश मारोती शेळके (रा मुकुंदवाडी, संजय नगर गल्ली नंबर 16) असे मृताचे नाव आहे. तर घटनेनंतर आरोपी पसार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून सचिन दशरथ शेळके आणि त्याचा चुलत भाऊ आकाश मारोती शेळके यांच्यात वाद होता. आकाश सेन्ट्रीग काम करतो तर सचिन सिडकोतील महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकत होता.
या दोघांच्या भाचीच्या हळदीचा कार्यक्रम शुक्रवारी रात्री चिकलठाण्यातील ऋषीकेश नगर येथे सुरू होता. तेथे नाचण्यावरून दोन्ही चुलत भावात पुन्हा वाद झाला. वाद वाढल्याने सचिनने आकाशच्या छातीत चाकू खुपसला. जखमी आकाशला नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. दरम्यान आरोपी फरार झाला. या घटनेची नोंद एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली . प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाले हे तपास करत आहेत.