शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीचे भाव कोसळले; शेतकरी संकटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 20:41 IST

परिसरात नोव्हेंबर महिन्यात सहा हजारांच्या घरात पोहोचलेला कापूस संक्रांतीनंतर मात्र चार हजार आठशे रुपये प्रति क्लिंटलपर्यंत खाली आल्याने दुष्काळी शेतक-यांवर संकट कोसळले आहे.

लाडसावंगी (जि. औरंगाबाद) : परिसरात नोव्हेंबर महिन्यात सहा हजारांच्या घरात पोहोचलेला कापूस संक्रांतीनंतर मात्र चार हजार आठशे रुपये प्रति क्लिंटलपर्यंत खाली आल्याने दुष्काळी शेतक-यांवर संकट कोसळले आहे. यामुळे ऐन लग्नसराईत मुला-मुलींचे लग्न पुढे ढकलण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.

लाडसावंगी परिसरात यंदा जेमतेम पाऊस झाला आहे. यामुळे खरीप पिकावर शेतक-यांनी केलेला खर्चही निघाला नाही. पुरेसा पाऊस नसल्याने २०१२ नंतर पुन्हा यंदा दुष्काळाचे तोंड शेतक-यांना पाहावे लागत आहे. त्यातच रबीचे पीक ही पाण्याअभावी शेतक-यांना घेता आले नाही. जेमतेम झालेल्या पावसावर आलेल्या कापसाला शेतक-याने मकर संक्रांतीनंतर विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे शेतक-यांनी आतापर्यंत कापूस जपून ठेवला होता. मात्र, संक्रांत होऊन पाच दिवस झाले तरी कापसाचे भाव वाढले नाहीत, उलट सहाशे ते आठशे रुपयांने कमी झाले आहेत. यामुळे बळीराजा पार संकटात सापडला असून, यंदाच्या वर्षी पकडलेली मुला-मुलींची लग्न पुढे ढकलण्याची वेळ बळीराजावर आली आहे. 

व्यापा-यांकडून शेतक-यांची लूटशासनाने कापूस खरेदी केंद्र सुरू केलेली नसल्याने व्यापारी संगनमत करून शेतक-यांना लुटत आहेत. व्यापारी कापूस खराब असल्याचे सांगत शेतक-यांकडून कमी दराने कापसाची खरेदी करीत आहेत. त्यातच शेतमालासाठी उसने घेतलेले पैसे परत वसुलीसाठी दुकानदार, सावकार तगादा लावत आहेत. यामुळे बळीराजाला कापूस विकण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने शेतकरी आहे त्या भावात कापसाची विक्री करीत आहेत.

घरात पैसा नाही, कापसाला भाव नाहीशेतक-यांना कापसाचे उत्पादन म्हणजे नगदी पीक समजले जाते. कापूस विकून झालेल्या उत्पादनातून मुला-मुलींचे लग्न दिवाळीनंतर जुळवाजुळव करून फेब्रुवारी ते मे महिन्यात उरकून घेतली जातात; परंतु घरात पैसा नाही, कापसाला भाव नाही. यामुळे मुला-मुलींचे लग्न सोहळे पुढील वर्षापर्यंत ढकलण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे.

टॅग्स :cottonकापूस