सौंदर्य बेटांकडे मनपाचे दुर्लक्ष
By | Updated: December 4, 2020 04:09 IST2020-12-04T04:09:26+5:302020-12-04T04:09:26+5:30
औरंगाबाद : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील ज्युबली पार्कसह विविध ठिकाणची सौंदर्य बेटे व रेल्वेस्टेशन ते सुभेदारी विश्रामगृह या व्हीआयपी रस्त्यावरील ...

सौंदर्य बेटांकडे मनपाचे दुर्लक्ष
औरंगाबाद : महापालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील ज्युबली पार्कसह विविध ठिकाणची सौंदर्य बेटे व रेल्वेस्टेशन ते सुभेदारी विश्रामगृह या व्हीआयपी रस्त्यावरील दुभाजकांमधील झाडे पाण्याअभावी सुकली आहेत. अनेक ठिकाणी दुभाजकांची पडझडही झाली आहे. याची त्वरित दुरुस्ती करुन शहराच्या सौंदर्यीकरणाकडे लक्ष देण्याची मागणी पुढे आली आहे.