शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर महानगरपालिकेला मिळाले आयुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 01:28 IST

महापालिका आयुक्त म्हणून डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी रात्री उशिरा पदभार स्वीकारला. मागील तीन महिन्यांपासून हे पद रिक्त होते.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिका आयुक्त म्हणून डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी रात्री उशिरा पदभार स्वीकारला. मागील तीन महिन्यांपासून हे पद रिक्त होते. आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविला होता. शहरात कचरा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर असताना महापालिकेला आयुक्त नसल्याने राजकीय मंडळींकडून बरीच ओरड करण्यात येत होती.१६ फेब्रुवारीपासून शहरात कचराकोंडी निर्माण झाली आहे. त्यानंतर मिटमिटा येथे कचरा टाकण्यास नागरिकांनी प्रचंड विरोध दर्शविला होता. पोलीस विरुद्ध नागरिक अशी दंगलही भडकली होती. दंगलीनंतर राज्य शासनाने आयुक्त डी.एम. मुगळीकर यांची तडकाफडकी बदली केली होती. दंगलीस कारणीभूत ठरवून पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनाही सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते, तेव्हापासून आजपर्यंत महापालिका आयुक्तपद रिक्तच होते. या पदावर वेगवेगळ्या अधिका-यांची वर्णी लागणार असल्याची अफवा अधूनमधून पसरत होती. आठ दिवसांपासून राज्य शासनाने डॉ. निपुण विनायक यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. नवनियुक्त आयुक्त दिल्लीत उपसचिव म्हणून कार्यरत होते. केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानात ते कार्यरत होते. घनकचरा व्यवस्थापनात त्यांनी उल्लेखनीय काम केलेले आहे. त्यामुळे शासनाने खास डॉ. विनायक यांची नियुक्ती केली.मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ते महापालिकेत दाखल झाले. त्यानंतर लगेच पदभारही स्वीकारला. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, स्वीय सहायक सुनील ढेकळे उपस्थित होते. नवनियुक्त आयुक्तांनी फुलांचा बुके स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे कच-यात अधिक भर पडते, असेही त्यांनी अधिका-यांना सांगितले. यापुढे अभ्यागतांनीही आपल्याकडे येताना फुलांचा बुके अजिबात आणू नये, असे आवाहन करण्यात आले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाcommissionerआयुक्त