coronavirus : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचे ९२ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 21:03 IST2020-06-04T21:03:15+5:302020-06-04T21:03:51+5:30

रोशन गेट येथील ५० वर्षीय महिला आणि कैसर कॉलनी येथील ६४ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

coronavirus: Worrying! 92 victims of corona in Aurangabad | coronavirus : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचे ९२ बळी

coronavirus : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचे ९२ बळी

औरंगाबाद : रोशन गेट येथील ५० वर्षीय महिला आणि कैसर कॉलनी येथील ६४ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन मृत्यूमुळे आतापर्यंतचा कोरोनाबाधितांचा मृत्यूचा आकडा ९२ झाला आहे.

शहरातील एका खाजगी रुग्णालयात भरती कैसर काॅलनी येथील ६४ वर्षीय वृद्धाला २८ मे रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांना कोरोनासोबत न्युमोनिया आणि अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा बुधवारी रात्री साडे अकरावाजता मृत्यू झाला. 

तर रोशन गेट येथील ५० वर्षीय महिलेला ३१ मे रोजी खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना २ जुन रोजी कोरोनाचे लागण झाल्याचे निदान झाले. कोरोनासह तीव्र श्वसनविकारामुळे त्यांचा गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाल्याचे  रुग्णालयाकडून कळवण्यात आले.

Web Title: coronavirus: Worrying! 92 victims of corona in Aurangabad