coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचे आणखी दोन बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 09:58 IST2020-05-20T09:57:42+5:302020-05-20T09:58:12+5:30
. या दोन मृत्यूमुळे औरंगाबादेत कोरोनाबाधित मयत रुग्णांची एकूण संख्या ३८ झाली आहे.

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचे आणखी दोन बळी
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाने आणखी दोघांचा बळी गेला. जयभीमनगर येथील ५५ वर्षीय आणि इंदिरानगर- बायजीपुरा येथील ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. या दोन मृत्यूमुळे औरंगाबादेत कोरोनाबाधित मयत रुग्णांची एकूण संख्या ३८ झाली आहे.
जयभीमनगर येथील ५५ वर्षीय रुग्ण १९ मे रोजी घाटीत दाखल झाला होता. त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ८७ टक्के होते. उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्याचा कोरोनाचा अहवाल रात्री ११.३० वाजता पॉझिटिव्ह आला.
इंदिरानगर-बायजीपुरा येथील ८० वर्षीय रुग्णाचा १४ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यांना १५ वर्षांपासून उचरक्तदाब होता. उपचार सुरू असताना २० मे रोजी सकाळी ६ वाजता मृत्यू झाला, अशी माहिती डॉ. गायकवाड यांनी दिली.