coronavirus : औरंगाबादेत आणखी दोन बाधितांचा मृत्यू; आतापर्यंत ८७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 07:30 PM2020-06-03T19:30:31+5:302020-06-03T19:41:26+5:30

रहीमनगर आणि इंदिरानगर येथील बाधितांचा मृत्यू

coronavirus: Two more corona infected dies in Aurangabad; 87 victims so far | coronavirus : औरंगाबादेत आणखी दोन बाधितांचा मृत्यू; आतापर्यंत ८७ बळी

coronavirus : औरंगाबादेत आणखी दोन बाधितांचा मृत्यू; आतापर्यंत ८७ बळी

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात बुधवारी आणखी दोन कोरोनाबाधित  रुग्णांचा मृत्यू झाला. रहीमनगर येथील ४२ वर्षीय पुरुष आणि इंदिरानगर-बायजीपुरा येथील ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती घाटीचे माध्यम समन्वय डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. औरंगाबादेत दिवभरात तिघांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण ८७ कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, बुधवारी सकाळी जिल्ह्यात बुधवारी सकाळी ४७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर शहरातील एका खासगी रुग्णालयामध्ये एन-४ ‍सिडको परिसरातील कोरोनाबाधित असलेल्या ७४ वर्षीय पुरूष रुग्णाचा बुधवारी सकाळी ६.३० वाजता खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

नव्याने निदान झालेल्या रुग्णांत जसवंतपुरा (१), संजय नगर, मुकुंदवाडी (१), खोकडपुरा (२), अजिंक्य नगर (१), समता नगर (२), समृद्धी नगर, एन-४सिडको (१), जय भवानी नगर (१), लेबर कॉलनी (२), मिल कॉर्नर (४), हमालवाडी, रेल्वे स्टेशन (१), भावसिंपुरा (२), शिवशंकर कॉलनी (५), पिसादेवी रोड (१), कटकट गेट (१), सिल्लेखाना नूतन कॉलनी (1), बारी कॉलनी (१),उल्का नगरी (१),एन-६, संभाजी कॉलनी, सिडको (१),शरीफ कॉलनी (१),कैलास नगर (४), स्वप्न नगरी, गारखेडा परिसर (१), भवानी नगर, जुना मोंढा (१), पुंडलिक नगर रोड, गारखेडा (१), विद्यानिकेतन कॉलनी (१), सुराणा नगर (२), अन्य (३) आणि यशवंत नगर, पैठण (३), अब्दुलशहा नगर, सिल्लोड (१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २१ महिला आणि २६ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६९६ झाली आहे. यापैकी १०८७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत ८७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला,तर सध्या ५२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Web Title: coronavirus: Two more corona infected dies in Aurangabad; 87 victims so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.