CoronaVirus : धोका वाढतोय ! औरंगाबादमध्ये दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ४० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 09:40 IST2020-04-23T09:37:40+5:302020-04-23T09:40:10+5:30
समता नगर आणि भावसिंगपुरा येथील रुग्ण

CoronaVirus : धोका वाढतोय ! औरंगाबादमध्ये दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ४० वर
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये आणखी दोन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात समतानगर येथील ४५ वर्षीय महिला आणि भीमनगर,- भावसिंगपुरा येथील ४५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे,अशी माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गुरुवारी ३८ वरून ४० वर गेली.
भीमनगर- भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा घाटीत उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी ७ वाजता मृत्यू झाला. मृत्यूनंतर तापणीसाठी घेण्यात आलेल्या स्वबचा अहवाल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. त्यानंतर या रुग्णाचे नातेवाईक आणि संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात आली. त्यात आता एक महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
समतानगर येथील आणखी एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. सदर रुग्ण ४५ वर्षीय महिला आहे.त्यामुळे या भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ६ वर गेली आहे.